घरक्रीडाDinesh Karthik: त्याची फलंदाजी पाहून पुन्हा खेळण्याची इच्छा; दिनेश कार्तिकवर डिव्हिलियर्स खूश

Dinesh Karthik: त्याची फलंदाजी पाहून पुन्हा खेळण्याची इच्छा; दिनेश कार्तिकवर डिव्हिलियर्स खूश

Subscribe

सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकची जोरदार चर्चा सुरु आहे. या हंगामात त्याने स्फोटक फलंदाजी केली आहे. त्याचा फॉर्म पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला असून मिस्टर 360 डिग्री एबी डिव्हिलियर्सचे नावही त्यात सामील आहे. दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून पुन्हा मैदानात उतरुन खेळण्याची इच्छा निर्माण झाली आहे, असे डिव्हिलियर्स म्हणाला.

कार्तिक सध्या ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये आहे, त्याने आरसीबीसाठी आधीच दोन सामने जिंकले आहेत. तो त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. तो जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे आणि मैदानाच्या प्रत्येक बाजूला 360 डिग्री शॉट्स खेळतोय, असे डिव्हिलियर्स म्हणाला.

- Advertisement -

कार्तिकला असे खेळताना पाहिल्यानंतर मला मैदानावर परत येऊन क्रिकेट खेळावेसे वाटते. मधल्या फळीत दडपणाखाली खेळून त्याने मला खूप उत्तेजित केले आहे आणि त्याला इतका अनुभव आहे. जर त्याने त्याचा फॉर्म कायम ठेवला तर त्यामुळे पुढे जाण्याची आरसीबीला चांगली संधी आहे, असे मत डिव्हिलियर्सने व्यक्त केले.

“मला खूप आश्‍चर्य वाटत आहे आणि मला त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. मला नेहमी माहीत होते की तो खूप सक्षम खेळाडू आहे. त्याला दबावात खेळायला आवडते. शेवटच्या वेळी मी त्याला आयपीएलपूर्वी पाहिले होते. तो यूकेमध्ये समालोचन करत होता. तो फारसे देशांतर्गत क्रिकेटही खेळत नव्हता. मला वाटले की तो आता निवृत्ती घेईल, असे डिव्हिलियर्स म्हणाला.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -