घरक्रीडासूर्याच्या फलंदाजीने मी खूप प्रभावित झालो पण...; एबीडीने दिला महत्त्वाचा सल्ला

सूर्याच्या फलंदाजीने मी खूप प्रभावित झालो पण…; एबीडीने दिला महत्त्वाचा सल्ला

Subscribe

भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषकात तुफानी फलंदाजी करत आहे. सूर्यकुमार यादवच्या या फलंदाजीची मिस्टर 360 म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाजी एबी डिव्हिलियर्स याने कौतुक केले आहे.

भारतीय संघाच्या मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव टी-20 विश्वचषकात तुफानी फलंदाजी करत आहे. सूर्यकुमार यादवच्या या फलंदाजीची मिस्टर 360 म्हणजेच दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाजी एबी डिव्हिलियर्स याने कौतुक केले आहे. ‘सूर्याच्या फलंदाजीने मी खूप प्रभावित झालो आहे. त्याने या स्तरापर्यंत येण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. तो सध्या कारकिर्दीच्या सर्वोत्तम टप्प्यावर आहे’, अशा शब्दांत एबीडीने सूर्याचे कौतुक केले. (AB de Villiers says Suryakumar Yadav will have to focus on consistency for next 10-12 years)

एबी डिव्हिलियर्सने लास्ट मॅन स्टँड्सच्या कार्यक्रमामध्ये सूर्यकुमार यादवचे कौतुक केले. यावेळी एबीडी म्हणाला की, “सुर्यकुमारची फलंदाजी शैली काहीशी माझ्या शैलीप्रमाणे आहे. तो माझ्यासारखा खेळतो. पण त्याला फक्त कामगिरीत सातत्य ठेवण्यावर भर द्यावा लागेल. पुढील 5-10 वर्षे त्याला हेच करावे लागणार आहे. तसेच सुर्यकुमारचे भविष्य खूप चांगले असणार आहे. जेव्हा मी सूर्याला पहिल्यांदा पाहिले होते. तेव्हापासून आतापर्यंत त्याने खूप प्रगती केली आहे. तो आता त्याच्या कारकिर्दीच्या शिखरावर आहे. सूर्याकडे मोठा अनुभवही आहे आणि साम्य आहे. आता तो सर्वांना आपली क्षमता दाखवून देतोय. जर त्याला फलंदाजीस लवकर पाठवले, तर तो आणखी मनोरंजन करेल आणि येत्या काळात तो नक्कीच भारताच्या सर्वोत्तम खेळाडूपैकी एक बनेल”, असे एबी डिव्हिलियर्सने म्हटले.

- Advertisement -

टी-20 विश्वचषकामध्ये सूर्यकुमार यादव सध्या दमदार फलंदाजी करत आहे. या टी-20 विश्वचषकामध्ये सूर्यकुमार यादवने 225 धावा केल्या आहेत. यामध्ये 3 अर्धशतकी खेळीच्या जोरावर सूर्याने एका वर्षात 1000 धावा करण्याच्या विक्रमाला देखील गवसणी घातली आहे. झिम्बाब्वेविरूद्धच्या सामन्यात त्याने 25 चेंडूत 61 धावांची अर्धशतकी खेळी केली होती.

भारत-झिम्बाब्वे सामन्यानंतर भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सूर्यकुमार यादवशी संवाद साधताना त्याच्या शॉट्सची तुलना दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज एबी डिव्हिलियर्सशी केली.

- Advertisement -

हेही वाचा – एनएमपीएलच्या चौथ्या पर्वाचा खेळाडू लिलाव संपन्न, हॉटेल ताजमध्ये पार पडला सोहळा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -