मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्याच्या टी-20 मालिकेतील पुण्यात (31 जानेवारी) खेळवण्यात आलेला चौथा सामना जिंकत भारताने 3-1 ने मालिका आधीच जिंकली आहे. यानंतर आज (2 फेब्रुवारी) पाचवा आणि शेवटचा सामना वानखेडे स्टेडियमवर पार पडत आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्माने अवघ्या 37 चेंडूंत वेगवान शतक पूर्ण केले. अभिषेक शर्माच्या या खेळीमुळे भारताचा एकदिवसीय आणि कसोटी संघाचा कर्णधार शर्माचा वेगवान शतकाचा विक्रम थोडक्यात बचावला आहे. (Abhishek Sharma brilliant innings narrowly saved Rohit Sharma record of fastest century)
नाणेफेक जिंकल्यानंतर इंग्लंड संघाने भारताचा प्रथम फलंदाजी करण्याची संधी दिली. सलामीवीर संजू सॅमसनच्या रुपात भारताला 21 धावांवर पहिला धक्का बसला. संजू सॅमसन 16 धावांवर बाद झाला. यानंतर सलामीवीर अभिषेक शर्माने धावा करण्याची सर्व सूत्रे आपल्याकडे घेतली. त्याने सुरुवातीपासूनच स्फोटक फलंदाजी केली आणि अवघ्या 17 चेंडूत 3 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 50 धावा केल्या. यासह तो भारतासाठी सर्वात जलद अर्धशतक करणारा दुसरा फलंदाज बनला. याआधी भारताचा डावखुरा माजी फलंदाज युवराज सिंगने फक्त 12 चेंडूंत अर्धशतक केले आहे.
हेही वाचा – U-19 Womens World Cup : भारतीय पोरींची कमाल, दुसऱ्यांदा कोरले विश्वचषकावर नाव
🎥 WATCH
Abhishek Sharma smashes India’s second-fastest T20I TON in Men’s Cricket 💯🔽#TeamIndia | #INDvENG | @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) February 2, 2025
अर्धशतक पूर्ण केल्यावरही अभिषेक शर्मा थांबला नाही. त्याने 37 चेंडूत इंग्लंडविरुद्धच्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यातील सर्वात वेगवान शतक केले. त्याने 37 चेंडूत 5 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 100 धावा पूर्ण केल्या. यासह अभिषेक शर्मा टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात जलद शतक करणारा दुसरा फलंदाज ठरला आहे. भारतासाठी 18 वा सामना खेळणाऱ्या अभिषेकचे हे दुसरे शतक आहे. त्याने यापूर्वी कारकीर्दीच्या दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध शतक झळकावले होते.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये सर्वात जलद शतक करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने 2017 मध्ये श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 35 चेंडूत शतक ठोकले होते. यानंतर अभिषेक शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर संजू सॅमसन हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 2024 मध्ये बांग्लादेशविरुद्ध 40 चेंडूंत आपले शतक पूर्ण केले आहे. यानंतर तिलक वर्माने 2024 मध्ये 41 चेंडूत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक केले आहे.
हेही वाचा – Prithviraj Mohol : पृथ्वीराज मोहोळ यंदाचा महाराष्ट्र केसरी, गोंधळानंतर महेंद्र गायकवाडने सोडलं मैदान