घरक्रीडाअभिनेता सोनू सूद करणार विशेष ऑलिम्पिक 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

अभिनेता सोनू सूद करणार विशेष ऑलिम्पिक 2022 मध्ये भारताचे प्रतिनिधित्व

Subscribe

सोनू सूदने खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केलं

भारतात कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून अनेक लोकांना प्रचंड मोठ्या संकटाचा सामना करावा लागला आहे. याचदरम्यान अभिनेता सोनू सूद लोकांच्या मदतीकरीता पुढाकार घेत असल्याचे दिसत आहे. सोनूने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्याच्यावर सर्व स्तरावरुन कौतूकाचा वर्षाव होत आहे. नुकतच सोनू सुदने त्याचा 48 वा वाढदिवस साजरा केला आणि  या खास दिवशी सोनूला स्पेशल ऑलिम्पिक मूमेंट ब्रॅन्ड अॅम्बॅसिडर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. तसेच पुढील वर्षी रुस मध्ये होणाऱ्या विशेष ऑलिम्पिक विश्व हिवाळी खेळाच्या(Special Olympics World Winter Games) भारतीय दलाचा भाग होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती समोर येत आहे. सोनू सूदने हि आनंदाची बातमी  भारताच्या खास एथलीट आणि अधिकाऱ्यांसोबत झालेल्या एका ऑनलाईन मिटींग दरम्यान शेअर केली आहे. तसेच सोनूने हि गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर करत लिहले आहे की, “आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत खास आहे. मला विशेष ऑलिम्पिकच्या या यात्रेत सहभागी होण्याचा आनंद होत आहे. मी स्वत:ला खूप भाग्यवान समजतो. या मंचाला अजून मोठं करण्यात तसेच भारताचे प्रतिनिधीत्व करण्याचे वचन देतो.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonu Sood (@sonu_sood)

- Advertisement -

सोनू सूदने खेळाडूंशी संवाद साधत त्यांच्या कामगिरीचे कौतुक केलं आणि त्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरे दिली. विशेष ऑलिम्पिक आशिया पॅसिफिक प्रदेशाचा उपक्रम असलेल्या #Walk For Inclusion खेळाडूंनी त्यांची ओळख करून दिली.दर दोन वर्षांनी हा खेळ आयोजित करण्यात येतो. बौद्धिक अपंग व्यक्तींसाठी ही सर्वात मोठी जागतिक क्रीडा स्पर्धा असते.


हे हि वाचा – अनु मलिकवर इस्त्रायल देशाचं राष्ट्रगीत कॉपी करण्याचा होतोय आरोप

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -