घरक्रीडाMaharashtra Kesari : आदर्श गुंड, विशाल बनकरची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

Maharashtra Kesari : आदर्श गुंड, विशाल बनकरची महाराष्ट्र केसरीसाठी निवड

Subscribe

मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाकडून निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र केसरी या मानाच्या कुस्ती स्पर्धेसाठी मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाची निवड चाचणी नुकतीच पार पडली. महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी गादी विभागात आदर्श गुंडची, तर माती विभागात विशाल बनकरची मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाकडून निवड करण्यात आली आहे. तसेच ५७ किलो वजनी गटातील गादीवरील कुस्तीसाठी विक्रम हगवणेची निवड झाली असून याच वजनी गटात मातीतील कुस्तीसाठी ओमकार जगदाळेची निवड करण्यात आली. मुंबई उपनगर जिल्हा तालीम संघाची निवड चाचणी यशस्वीरीत्या पार पडण्यात तालीम संघाचे अध्यक्ष संपत साळुंखे, सचिव विनायक गाढवे, खजिनदार सतीश कदम, सहसचिव महादेव ढमाळ, नंदु मांढरे, तालीम संघाचे कार्यकारी सदस्य तानाजी राजगे, दिलीप सरक, मुकूंद कांचन, जगन्नाथ कोळपे, जगदीश गायकवाड, शरद राजगे, यशवंत जमदाडे, सुरेश जगदाळे यांनी महत्वाची भूमिका बजावली.

-निवड झालेले पैलवान 
५७ किलो : विक्रम हगवणे (गादी), ओमकार जगदाळे (माती)
६१ किलो : सौरभ हगवणे (गादी), अक्षय करे (माती)
६५ किलो : शुभम ढमाळ(गादी), रितीक पाचपुते (माती)
७० किलो : मंदार कदम (गादी), शुभम जमदाडे (माती)
७४ किलो : पांडुरंग वाघमोडे (गादी), सुरज विरकर (माती)
७९ किलो : सुमित मरगजे (गादी), शुभम गाढवे (माती)
८६ किलो : राम धायगुडे (गादी), गोविंद दिडवाघ (माती)
९२ किलो : शुभम गव्हाणे(गादी), सारंग सोनटक्के (माती)
९७ किलो : अक्षय गरुड (गादी),संग्राम साळुंखे (माती)
महाराष्ट्र केसरी : आदर्श गुंड (गादी),विशाल बनकर (माती) 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -