घरक्रीडाAfghanistan crisis : सरावाला सुरुवात, पण अफगाण क्रिकेटपटूंमध्ये भीतीचे वातावरण

Afghanistan crisis : सरावाला सुरुवात, पण अफगाण क्रिकेटपटूंमध्ये भीतीचे वातावरण

Subscribe

अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू सराव करत असले, तरी त्यांना क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे अवघड जात आहे. 

अफगाणिस्तानमध्ये तालिबानने (Taliban in Afghanistan) पुन्हा ताबा मिळवला आहे. अफगाणिस्तानमधील परिस्थिती अतिशय गंभीर आहे. परंतु, या परिस्थितीतही अफगाणिस्तान क्रिकेट संघाच्या आघाडीच्या खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली आहे. या खेळाडूंनी काबुलच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सराव केला. एकीकडे शांत वातावरणात, रिकाम्या स्टेडियममध्ये अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू सराव करत होते, तर दुसरीकडे त्यांच्यापासून काही किमीच्या अंतरावरच हजारो अफगाण नागरिकांनी देशाबाहेर जाण्यासाठी काबुल विमानतळावर जमले होते. त्यामुळे अफगाणिस्तानचे क्रिकेटपटू सराव करत असले, तरी त्यांना क्रिकेटवर लक्ष केंद्रित करणे अवघड जात आहे.

तालिबानवर विश्वास कसा ठेवणार? 

अफगाण क्रिकेटपटूंच्या डोळ्यात, आवाजात, ते देत असलेल्या संदेशात भीती दिसून येत आहे. तालिबानने अफगाणिस्तानच्या कोणत्याही खेळाडूंना त्रास देणार नसल्याचे सांगितले आहे. परंतु, त्यांच्यावर विश्वास कसा ठेवणार? असे अफगाणिस्तानचा वेगवान गोलंदाज नवीन-उल-हक म्हणाला. नवीन सध्या वेस्ट इंडिजमध्ये असून कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये खेळणार आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानला मदत करावी

तालिबानने पुन्हा ताबा मिळवल्यामुळे अफगाणिस्तानमध्ये सध्या भीतीचे वातावरण आहे. तसेच परदेशात असलेले अफगाण नागरिकही तणावात आहेत. तालिबानने याआधी १९९६ ते २००१ या कालावधीत अफगाणिस्तानवर ताबा मिळवला होता. त्यावेळी त्यांनी मनोरंजनाच्या सर्व साधनांवर बंदी घातली होती. तसेच खेळ मर्यादित स्वरूपात सुरु ठेवण्यात आले होते आणि केवळ पुरुषांना खेळण्याची व खेळ पाहण्याची परवानगी होती. त्यामुळे पुन्हा अशी परिस्थिती होऊ नये यासाठी जगभरातील राष्ट्राध्यक्ष आणि इतर नेत्यांनी एकत्रित येत अफगाणिस्तानला मदत करावी, असे आवाहन अफगाणिस्तानचा माजी कर्णधार मोहम्मद नबीने केले होते.


हेही वाचा – अफगाणिस्तान-पाकिस्तान वनडे मालिका श्रीलंकेऐवजी आता पाकमध्ये

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -