घरक्रीडाअफगाणिस्तानचा चाहता झाला उत्साही; षटकार मारताच हार्दिकला केले किस

अफगाणिस्तानचा चाहता झाला उत्साही; षटकार मारताच हार्दिकला केले किस

Subscribe

आशिया चषक 2022 स्पर्धेला सुरूवात झाली असून या स्पर्धेतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे.

आशिया चषक 2022 स्पर्धेला सुरूवात झाली असून या स्पर्धेतील दुसरा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात झाला. या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने या सामन्यात अखेरीस षटकार मारत सामना जिंकवला. मात्र, भारताने हा सामना जिंकल्या त्यावेळी पांड्याने लगवलेल्या षटकारमुळे खुश होत अफगाणिस्तानच्या एका तरुणाने हार्दिक पांड्याची किस घेतली. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंज व्हायरल होत आहे. (Afghanistan man kissed to hardik pandya on tv when india beat pakistan in asia cup 2022)

सामनाच्या शेवटी हार्दिक पांड्या जेव्हा टीव्हीवर दिसतो. त्यावेळी हा तरुण उठतो आणि त्या टीव्हीतील हार्दिक पांड्याला किस करतो. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल माडियावर चांगलाच व्हायरल झाला असून, भारतीय क्रिकेटच्या चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट आणि लाइक्सचा वर्षाव केला आहे.

- Advertisement -

रविवार 28 ऑगस्ट रोजी झालेल्या आशिया कपमधील भारत आणि पाकिस्तान या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 विकेट राखून पराभव केला. पाकिस्तानचा स्कोअर 19.4 षटकांत 147 धावांवर पार केल्यानंतर भारताने यूएईच्या मैदानावर त्याचा बदला घेतला. भारताकडून विराट कोहली, जडेजाची खेळी उत्कृष्ट होती, पण हार्दिक पांड्याने 33 धावा करत सामना पुन्हा भारताच्या बाजूने वळवला.

हार्दिक पंड्या याने गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोन्ही विभागात आपली भूमिका चोखपणे बजावली. त्याने गोलंदाजीमध्ये तीन गडी बाद करून पाकिस्तान संघाला रोखलं. तर भारताची स्थिती बिकट झालेली असताना त्याने चार चौकार आणि एक षटकार लगावत 33 धावा केल्या.

- Advertisement -

हेही वाचा – ‘राष्ट्र प्रथम’ म्हणणाऱ्या अमित शहांच्या मुलाकडून तिरंगा हाती घेण्यास नकार, नेटिझन्सकडून संताप

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -