Afghanistan Under 19 Team, World Cup : तालिबानी दहशतीनं अफगाण खेळाडूंचा मायदेशी परतण्यास नकार, UK मध्ये मागितला आश्रय

तालिबान सरकारच्या काळात पहिल्यांचा वरिष्ठ अफगाण संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये भाग घेतला होता. तसेच माजी खेळाडूंनी जे खेळाडू परत येण्यास नकार देत आहेत त्यांना परतण्याची विनंती केली आहे.

Afghanistan Under 19 Team, World Cup Afghan players refuse to return home due to Taliban terror
Afghanistan Under 19 Team, World Cup : तालिबानी दहशतीनं अफगाण खेळाडूंचा मायदेशी परतण्यास नकार, UK मध्ये मागितला आश्रय

वेस्टइंडिजमध्ये खेळवण्यात आलेला अंडर-१९ विश्वचषकावर भारताने आपलं नाव कोरलं आहे. भारतीय संघाच्या युवा खेळाडूंनी पाचव्यांदा विश्वचषक मिळवला आहे. विश्वचषक संपल्यावर सर्व देशांचे खेळाडू आपल्या मायदेशी परतले आहेत. परंतु अफगाणिस्तानची अंडर-१९ टीम अद्याप मायदेशी परतली नाही. तालिबानच्या दहशतीमुळे अंडर-१९ टीम परतण्यास घाबरत असल्याची माहिती मिळाली आहे.

अफगाणिस्तानची अंडर-१९ टीम वेस्ट इंडिजवरुन परतत असताना इंग्लंडमध्ये मुक्कामी आहे. संघातील काही खेळाडूंनी पुन्हा अफगाणिस्तानमध्ये परत जाण्यास नकार दिला आहे. कारण अफगाणिस्तानमधील परिस्थिती सध्या ठीक नाही. अशा परिस्थिती काही खेळाडू आणि कर्मचाऱ्यांनी अशी मागणी केली आहे की त्यांना इग्लंडमध्ये आश्रय देण्यात यावा.

अफिगाणिस्तान संघासाठी अंडर-१९ वर्ल्ड कप २०२२ चांगला राहिला आहे. या विश्वचषकात संघ गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर राहिला असून संघाने आतापर्यंतची सर्वात चांगली कामगिरी केली आहे. परंतु या उत्साहातसुद्धा खेळाडूंना मायदेशी परतण्याची भीती वाटत आहे.

अफगाणी माध्यमांनुसार संघातील काही खेळाडू, बोर्डाचे सदस्य वेस्ट इंडिजवरुन परतल्यानंतर इंग्लंडला पोहोचले. यानंतर त्यांना काबुलसाठी विमान पकडण्यास नकार दिला आहे. ज्यांनी इग्लंडमध्ये आश्रयासाठी नोंदणी केली आहे. त्यांची नावे अद्याप गुलदस्यात ठेवण्यात आली आहेत.

अफगाणिस्तानमध्ये तालिबानचे सरकार आल्यानंतर अफगाणी अंडर-१९ संघाने पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला आणि तालिबान सरकार स्थापन केलं आहे. तसेच तालिबान सरकारच्या काळात पहिल्यांचा वरिष्ठ अफगाण संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये भाग घेतला होता. तसेच माजी खेळाडूंनी जे खेळाडू परत येण्यास नकार देत आहेत त्यांना परतण्याची विनंती केली आहे. कारण तेच देशातील भविष्यातील क्रिकेट खेळाडू आहेत.


हेही वाचा : chinese player peng shuai : लैंगिक छळाच्या आरोपाबद्दल टेनिस स्टार खेळाडू पेंग शुईने बदललं विधान