घरक्रीडाT20 world cup 2021 : AFG VS NAM अफगाणिस्तानने ६२ धावा राखून...

T20 world cup 2021 : AFG VS NAM अफगाणिस्तानने ६२ धावा राखून सामन्यावर मिळवले वर्चस्व

Subscribe

टी २० विश्वचषकात सुपर १२ साठी झालेल्या अफगाणिस्तान आणि नामिबियाच्या लढतीत अफगाणिस्तानने ६२ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला

टी २० विश्वचषकात सुपर १२ साठी झालेल्या अफगाणिस्तान आणि नामिबियाच्या लढतीत अफगाणिस्तानने ६२ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत नामिबियाला १६१ धावांचे आव्हान दिले. अफगाणिस्तानचा पहिला बळी संघाची धावसंख्या ५३ असताना गेला. मोहम्मद शहजाद आणि कर्णधार नबीच्या सावधखेळीच्या बदल्यात संघाने १६० धावांपर्यंत मजल मारली. अफगाणिस्तानने आक्रमक गोलंदाजीच्या जोरावर प्रतिस्पर्धी संघाला चांगलीच धूळ चारल्याचे पहायला मिळाले. नवीन-उल-हक आणि हमीद हसनच्या प्रत्येकी ३ बळींच्या बदल्यात अफगाणिस्तानने सामन्यावर एकहाती विजय मिळवला. अफगाणिस्तानच्या आक्रमक गोलंदाजीसमोर नामिबियाची फलंदाजी पूर्णत: अपयशी ठरली.

अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने सांघिक खेळीच्या जोरावर २० षटकांत ५ बाद १६० धावांची उभारणी केली. अफगाणिस्तानकडून मोहम्मद शहजादने सर्वाधिक ४५ धावा केल्या. त्याच्या पाठोपाठ कर्णधार नबीने नाबाद ३२ तर असघर अफघानने ३१ धावा करून साजेशी धावसंख्या उभारली. अफगाणिस्तानकडून २ गोलंदाज वगळता निराशाजनक गोलंदाजी पहायला मिळाली. रूबेन ट्रम्पलेन आणि लोफ्टी ईटनने अनुक्रमे ४ षटकांत प्रत्येकी २ बळी घेतले. तर स्मितला १ बळी घेण्यात यश आले.

- Advertisement -

बदल्यात नामिबियाकडून फारच निराशाजनक फलंदाजी पहायला मिळाली. डेविड वाइस वगळता कोणत्याच फलंदाजाला २० पेक्षा जास्त धावा करता आल्या नाहीत. अखेर २० षटके ९ बाद ९८ धावांपर्यंतच नामिबियाचा संघ पोहचू शकला.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान – मोहम्मद शहजाद (४५), नबी (३२), हजरतुल्लाह जजाई (३३), असगर अफगान (३१)- २० षटके पूर्ण धावसंख्या १६०-५,
नवीन-उल-हक (३) बळी, हमीद हसन (३) बळी, गुलबदिन नायब (२) बळी, राशिद खान (१) बळी,

- Advertisement -

नामिबिया – डेविड वाइस (२६), लोफ्टी ईटन (१४), रूबेन ट्रम्पलेन, गेरहार्ड इरास्मस (१२) – २० षटके पूर्ण धावसंख्या ९८-५
रूबेन ट्रम्पलेन (२) बळी, लोफ्टी ईटन (२) बळी, स्मित (१) बळी,

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -