Homeक्रीडाChampions Trophy controversy : शोएब अख्तरचे पाकिस्तानला आवाहन; भारतात जा आणि तिथेच...

Champions Trophy controversy : शोएब अख्तरचे पाकिस्तानला आवाहन; भारतात जा आणि तिथेच त्यांना…

Subscribe

बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तसेच हायब्रिड मॉडेलनुसार, स्पर्धा व्हावी, अशी मागणी करत आहेत. त्यामुळे पीसीबीनेही काही अटींसह हे मान्य केले आहे. यावर आता 'रावपिंडी एक्सप्रेस' या नावाने प्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे माजी जलदगती गोलंदाजी शोएब अख्तर यांनी भाष्य केले आहे.

नवी दिल्ली : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या यजमानपदावरून गेल्या काही दिवसांपासून वाद होताना दिसत आहे. भारत आणि पाकिस्तानमध्ये संघर्षाची परिस्थिती आहे. बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास स्पष्ट नकार दिला आहे, तसेच हायब्रिड मॉडेलनुसार, स्पर्धा व्हावी, अशी मागणी करत आहेत. त्यामुळे पीसीबीनेही काही अटींसह हे मान्य केले आहे. यावर आता ‘रावपिंडी एक्सप्रेस’ या नावाने प्रसिद्ध असलेले पाकिस्तानचे माजी जलदगती गोलंदाजी शोएब अख्तर यांनी भाष्य केले आहे. तसेच पाकिस्तानने भारतात जाऊन तिथेच त्यांना पराभूत करून यायला हवे, अशी इच्छाही व्यक्त केली आहे. (After Champions Trophy controversy, Shoaib Akhtar tells Pakistan to go to India and beat them there)

एका पाकिस्तानी वृत्तसंस्थेच्या कार्यक्रमात बोलताना शोएब अख्तर यांनी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी आणि हायब्रिड मॉडेलवर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या होस्टिंग अधिकार आणि कमाईसाठी तुम्हाला पैसे मिळत आहेत, हे हे ठीक आहे. त्यामुळे आम्ही पाकिस्तानची भूमिका योग्य आहे, असे समजू शकतो. आम्ही आमच्या देशात चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यास सक्षम झालो आणि ते (भारत) यायला तयार नसतील, तर आयसीसीने आमच्यासोबत स्पर्धेचा महसूल वाटून घ्यावा, हा एक चांगला निर्णय आहे. पण मला वाटते की, हायब्रीड मॉडेलवर आधीच स्वाक्षरी झाली होती, अशी भूमिका अख्तर यांनी मांडली.

हेही वाचा – Prithvi Shaw : …त्यामुळेच तो अशा बॅड पॅचमधून जातोय; पृथ्वी शॉच्या बालपणीच्या प्रशिक्षकांकडून नाराजी

भविष्यात पाकिस्तान संघ भारतात पाठवण्याबाबतही शोएब अख्तर यांनी भाष्य केले. त्यांनी म्हटले की, पीसीबीने भविष्यातील आयसीसी स्पर्धांसाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवावा. पण, पाकिस्तान संघ भारतात पाठवण्याआधी त्यांनी आपल्या संघाची अशा प्रकारे बांधणी केली पाहिजे की, आपला संघ भारताला त्यांच्याच घरात पराभूत करू शकेल. तसेच भविष्यात भारतात खेळण्याच्या दृष्टीने आपण मैत्रीचा हात पुढे केला पाहिजे आणि त्यांच्याकडे जायला हवे. माझा विश्वास नेहमीच राहिला आहे की, भारतात जा आणि तिथेच त्यांना चीतपट करून या, असे आवाहन शोएब अख्तर यांनी पाकिस्तान संघाला केले.

हायब्रीड मॉडेलबाबत एकमत!  

दरम्यान, चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, भारताचे सामने दुबईत होणार आहेत. जर भारत उपांत्य फेरीत पोहोचला तर दोनपैकी एक उपांत्य फेरी दुबईत खेळवली जाईल. तर भारताने अंतिम फेरी गाठली, तर अंतिम सामनाही दुबईत खेळवला जाईल. पण जर भारतीय संघ स्पर्धेतून बाहेर पडला, तर उपांत्य फेरी आणि अंतिम असे दोन्ही सामने पाकिस्तानमध्ये खेळवण्यात येतील.

हेही वाचा – IND VS JPN U19 : कर्णधार मोहम्मद अमानचे दमदार शतक; जपानसमोर 340 धावांचे आव्हान


Edited By Rohit Patil