Video: गर्लफ्रेंडला प्रपोज केल्यानंतर दीपक चाहरची धोनी आणि टीमने केले ‘असे’ हाल, पाहा व्हिडिओ

दीपकने दुबई इंटरनॅशन क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंड जया भारद्वाजला प्रपोज केले

after Deepak Chahar proposes to girlfriend Jaya Bhardwaj Video of celebration with Dhoni and team goes viral
Video: गर्लफ्रेंडला प्रपोज केल्यानंतर दीपक चाहरची धोनी आणि टीमने केले 'असे' हाल, पाहा व्हिडिओ

चेन्नई सुपर किंगचा सुपरफास्ट बॉलर दीपक चाहरने (Deepak Chahar)  आयपीएल लीगच्या शेवटच्या मॅचनंतर त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केले. चेन्नई सुपर किंग (CSK) जरी सामना हरली असली तरी दीपकच्या आयुष्यातील महत्त्वाचा दिवस संपूर्ण टीमने मोठ्या उत्साहात सेलिब्रेट केला. दुबई इंटरनॅशन क्रिकेट स्टेडियमच्या बाहेर गुडघ्यावर बसून गर्लफ्रेंड जया भारद्वाज (jaya bhardwaj) हिला प्रपोज केले. हा सगळा प्रकार पाहून त्याची गर्लफ्रेंड हैराण झाली. त्यानंतर दीपकने गर्लफ्रेंड आणि चेन्नईच्या संपूर्ण टीमसोबत या दिवसाचे सेलिब्रेशन केले. सेलिब्रेशनमध्ये मात्र मित्रांनी दीपकची पूर्ती मजा घेतल्याचे समोर आले आहे. सध्या हा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

हॉटेलवर जाताच दीपक आणि त्याच्या गर्लफ्रेंडने केक कापला आणि त्यानंतर चेन्नईच्या संपूर्ण टीमने दीपकला चारीबाजूने उचलले. सुरेश रैना, रवींद्र जडेजा,रॉबिन उथ्थपा आणि बरेच खेळाडूंनी दीपकच्या चेहऱ्यावर केक लावला. यावेळी दीपकचा चेहरा बघण्यासारखा झाला होता. दीपकच्या डोक्यावर चेहऱ्यावर संपूर्ण केक चिकटला होता. धोनी देखील दीपकला केक लावून गपचूप बाहेर निघून गेला. चेन्नई सुपरकिंगने हा व्हिडिओ त्यांच्या अधिकृत पेजवरुन पोस्ट केला आहे. अनेकांनी या फोटोला पसंती दर्शवली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl)

दीपकचा व्हिडिओ पाहून अनेकांनी लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पाडला आहे. त्याचप्रमाणे दीपकच्या नव्या इनिंगसाठी त्याला त्याच्या फॅन्सने शुभेच्छा देत त्याचे कौतुकही केले आहे. सेलिब्रेशनकरुन चेन्नईच्या टीमने दीपकच्या नवीन इनिंगची जोरदार सुरुवात करुन दिली आहे. दीपक आणि जया यांच्या जोडीची देखील सर्वत्र चर्चा सुरू आहे. दीपकने जयाला प्रपोज करतानाचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.


हेही वाचा – IPL 2021 : मुंबई इंडियन्सचे प्ले ऑफचे भवितव्य ठरवणार कोणत समीकरण ?