घरक्रीडादुखापतीमुळे भारतीय संघाचा 'हा' खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकण्याची शक्यता

दुखापतीमुळे भारतीय संघाचा ‘हा’ खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकण्याची शक्यता

Subscribe

इंडियन प्रीमियर लीग (आयीपीएल) संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका खेळणार आहे. पाच टी 20 सामन्यांची ही मालिका असणार असून, आयपीएलमधील अनेक खेळाडूंसाठी या दौऱ्यात खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयीपीएल) संपल्यानंतर भारतीय संघ दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका खेळणार आहे. पाच टी 20 सामन्यांची ही मालिका असणार असून, आयपीएलमधील अनेक खेळाडूंसाठी या दौऱ्यात खेळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दक्षिणा आफ्रिका दौऱ्यानंतर टी-२० चषक असल्याने खेळाडूंच्या सरावाच्या दृष्टीने बीसीसीआय नव्या खेळाडूंना या दौऱ्याला संधी देऊ शकते. मात्र, सध्या भारतीय संघात खेळणारा महत्वाचा खेळाडू म्हणजेच सुर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेयर सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे आयपीएलच्या उर्वरित सीजनमध्ये खेळू शकणार नाही आहे. त्याला स्नायुंची दुखापत झाली आहे. आयपीएलमध्ये सुरुवातीचे दोन सामनेही सुर्यकुमार यादव दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता.

बीसीसीआयच्या निवड समितीचे सदस्य आयपीएलमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीवर लक्ष ठेवून आहेत. खराब फॉर्ममध्ये असलेल्या काही सिनियर खेळाडूंना डच्चू सुद्धा मिळू शकतो. त्याचवेळी खेळाडूंच्या दुखापती सुद्धा टीम इंडियाच्या अडचणी वाढवू शकतात. आयपीएलमध्ये खेळत नसल्याने सूर्यकुमारला विश्रांती मिळेल, तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी उपलब्ध होईल ही शक्यता आहे. मात्र वेळेत सूर्यकुमार यादव दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या संपूर्ण मालिकेला मुकू शकतो.

- Advertisement -

निवड समितीच्या सदस्य यांनी इनसाइड स्पोर्ट्सला दिलेल्या माहितीनुसार, “सूर्यकुमार यादवची दुखापत थोडी गंभीर आहे. त्याला विश्रांतीची गरज आहे. त्याला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिकेलाही मुकावे लागू शकते. तो पूर्णपणे फिट नसेल, तर आम्ही त्याच्या निवडीची घाई करणार नाही” असं निवड समितीच्या सदस्याने इनसाइड स्पोर्ट्सला सांगितलं.

सध्या सूर्यकुमार मुंबई इंडियन्सच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली आहे. रिहॅबसाठी पुढच्या आठवडयात तो राष्ट्रीय क्रिकेट प्रबोधिनी (NCA)मध्ये जाणार आहे. “एकदा तो NCA मध्ये आला की, आम्हाला त्याच्या दुखापतीची नेमकी कल्पना येईल. त्यानंतरच आम्ही निर्णय घेऊ. तो पुढच्या आठवड्यात NCA मध्ये येईल. भारताच्या T 20 वर्ल्ड कप संघातील तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे आम्ही घाई करणार नाही” असं निवड समितीच्या सदस्याने सांगितलं.

- Advertisement -

हेही वाचा – IPL 2022 : हार्दिकचा ‘गुजरात’ संघ आयपीएलच्या प्लेऑफमध्ये पोहचणारा पहिला संघ

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -