घरक्रीडाMS Dhoni पाठोपाठ Suresh Raina चीही निवृत्तीची घोषणा!

MS Dhoni पाठोपाठ Suresh Raina चीही निवृत्तीची घोषणा!

Subscribe

भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने आज संध्याकाळी निवृत्तीची घोषणा करून आपल्या चाहत्यांना धक्का दिल्यानंतर आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवत भारताचा डावखुरा बॅट्समन सुरेश रैना याने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. धोनीच्या निवृत्तीचा संदर्भ देऊन रैनाने महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपणही निवृत्त होत असल्याचं जाहीर केलं आहे. महेंद्र सिंह धोनीने ७ वाजून ३० मिनिटांनी आपल्या निवृत्तीची घोषणा केल्यानंतर त्याच्या पाठोपाठ लगेच ८ वाजता सुरेश रैनाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर निवृत्तीची पोस्ट टाकली. महेंद्रसिंह धोनीप्रमाणेच सुरेश रैनाने देखील फक्त आपल्या निवृत्तीच्या पोस्टमध्ये फक्त २ ओळींचा मेसेज टाकला आहे. रैना म्हणतो, ‘तुझ्यासोबत खेळणं हा खूपच प्रेमळ अनुभव होता माही. मोठ्या अभिमानाने मी तुझ्यासोबत या प्रवासात येत आहे. थँक यू इंडिया. जय हिंद!’

- Advertisement -

रैनाचं टेस्ट करिअर (२०१० ते २०१५)

मॅच – १८
रन – ७६८
शतक – १
सर्वोच्च धावसंख्या – १२०
बॅटिंग सरारसी – २६.४८
कॅच – २३
विकेट – २३

रैनाचं वन डे करिअर (२००५ ते २०१८)

मॅच – २५६
रन – ५६१५
शतक – ५
सर्वोच्च धावसंख्या – ११६
बॅटिंग सरारसी – ३५.३१
कॅच – १०२
विकेट – ३६

- Advertisement -

रैनाचं टी-२० करिअर (२००६ ते २०१८)

मॅच – ७८
रन – १६०५
शतक – १
सर्वोच्च धावसंख्या – १०१
बॅटिंग सरारसी – २९.१८
कॅच – ४२
विकेट – १३


हेही वाचा – MS Dhoni ची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा!
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -