घरक्रीडाराहुल द्रविडनंतर अजिंक्य रहाणेचा विनिंग शॉर्ट

राहुल द्रविडनंतर अजिंक्य रहाणेचा विनिंग शॉर्ट

Subscribe

राहुल द्रविड नंतर अजिंक्य रहाणेने विनिंग शॉर्ट मारला आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेने सगळे विक्रम मोडले आहे. माजी क्रिकेटपटू राहूल द्रविड यांच्यासोबत बरोबरी करण्याचा प्रयत्न रहाणेने केला आहे.

अंजिक्य रहाणेच्या दमदार खेळीमुळे भारतीय संघाच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ८ विकेटने पराभव केला. भारताने मेलबर्न मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले. हा सामना जिंकण्यामध्ये भारतीय संघाचा कॅप्टन अजिंक्य रहाणे याचा मोठा वाटा आहे. अजिंक्य रहाणेने नॅथन लायनच्या चेंडूला ऑन साइडवर खेळून भारतीय संघाने मेलबर्नमध्ये मैदान मारले. राहुल द्रविड नंतर अजिंक्य रहाणेने विनिंग शॉर्ट मारला आहे. या सामन्यात अजिंक्य रहाणेने सगळे विक्रम मोडले आहे. माजी क्रिकेटपटू राहूल द्रविड यांच्यासोबत बरोबरी करण्याचा प्रयत्न रहाणेने केला आहे. अजिंक्यने पहिल्या डावातच १३१ धावांनी मागे असलेल्या ऑस्ट्रेलियाला दुसऱ्या डावात २०० धावांपर्यत मजल मारली.

या सामन्यामध्ये भारताडून विनिंग शॉर्ट मारणाऱ्या भारताचा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे याने टेस्ट करिअरमध्ये पहिल्यांदा विजय मिळवला आहे. त्याचप्रमाणे भारताचे माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याच्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर विजय मिळवणारा रहाणे हा दुसरा भारतीय खेळाडू आहे.

- Advertisement -

आजचा दिवस अजिंक्य रहाणेच्या नेतृत्व गुणांचे कौतुक करणारा असला तरीही सोशल मिडियावर मात्र अनेक युजर्सने राहुल द्रविड याच्या कामगिरीची आठवण काढली आहे. भारतीय संघामध्ये पहिल्यांदा पदार्पण करणाऱे दोन खेळाडूंच्या निमित्तानेही राहुल द्रविडची युजर्सने आठवण काढली. पण त्याहूनही राहुल अधिक आठवला तो म्हणजे ऑस्ट्रेलियातील २००३-०४ मधील चमकदार कामगिरीमुळे. राहुल द्रविड याने क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अंडर १९ आणि इंडिया ए या टिमच्या कोचिंगची जबाबदारी सांभाळली आहे. त्याचबरोबर राहुल द्रविड नॅशनल क्रिकेट अकादमीच्या प्रमुख पदाची जबाबदारीही सांभाळली होती. द्रविड यांनी भारतीय सिनिअर पुरूष टिमच्या कोच बनवण्याची मागणीही करण्यात आली होती. राहुल द्रविडने कौटुंबिक कारणांमुळे त्यासाठी नाही म्हटले होते. राहुल द्रविडने तरूण खेळाडूंना ओळखून त्यांना मॅचसाठी तयार केले. पृथ्वी शॉ आणि शुभमन गिल हे त्यातील खेळाडू आहेत.

विराट कोहलीच्या पितृत्त्वाच्या रजेनंतर अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. अजिंक्यच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर दणदणीत विजय मिळवला. राहुल द्रविड नंतर विनिंग शॉर्ट मारणारा दुसरा खेळाडू ठरला त्याचप्रमाणे एमएस धोनी नंतर पहिल्यांदा तिन्ही मॅच जिंकणारा रहाणे हा दुसरा कर्णधार ही बनला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – IND VS AUS : Adelaide च्या पराभवानंतर ड्रेसिंग रूममध्ये फक्त सन्नाटा होता – रवी शास्त्री

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -