CSK ची चिंता वाढली! हरभजनही IPL मधून माघार घेण्याच्या तयारीत!

Harbhajan sigh
हरभजन सिंग

आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईत दाखल झालेल्या चेन्नई सुपरकिंग्ज संघासमोरच्या अडचणी काही केल्या कमी होत नाहीयेत. चैन्नई संघ दुबई पोहचल्या पोहचल्या त्यातील १३ लोकांना कोरोनाची लागण झाली. त्यातील २ खेळाडू होते. त्यानंतर संघातील महत्त्वाचा फलंदाज सुरेश रैनाने स्पर्धेतून अचानक माघार घेतली. रैनाने वैयक्तिक कारणासाठी माघार घेतल्याच म्हटलं जात असलं तरी त्यानंतर अनेक बातम्या समोर आल्या. त्यानंतर आता आणखी एक झटका चैन्नई टीमला बसण्याची शक्यता आहे. संघातील महत्त्वाचा फिरीकपटू हरभजन सिंहदेखील तेराव्या हंगामातून माघार घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण हरभजन सिंह अद्याप युएईत दाखल झालेला नाहीये.

चेन्नईच्या संघातील महत्त्वाच्या सूत्रांनी ANI ला दिलेल्या माहितीनुसार, ‘हरभजन यंदाच्या हंगामात खेळमार आहे की नाही याबाबत त्याने कोणतीच माहिती अद्याप संघाला दिलेली नाहीये. तो अद्याप युएईत दाखल ही झालेला नाहीये. तो येणार आहे की नाही याबाबत कोणतीच अधिकृत घोषणा त्याने केलेली नाही. त्यामुळे संघाने आता त्याच्याशिवायच तयारीला सुरूवात केली आहे. संघ गुरूवार, शुक्रवारपर्यंत त्याच्या उत्तराची वाट बघणार आहे.पण खबरदारीचा उपाय म्हणून मॅनेजमेंटने टीमा हरभजन संघात नसेल असं धरुन रणनिती आखायला सांगितलेलं आहे.”

१९ सप्टेंबरपासून आयपीएलच्या तेराव्या हंगामाला सुरुवात होणार असून शुक्रवारपासून चेन्नईचा संघ सरावाला सुरुवात करणार आहे. त्यामुळे आगामी काळात हरभजन सिंह आयपीएलसाठी संघात दाखल होतो की नाही हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  रैना आणि भज्जी दोघेही न खेळल्यास सीएसकेच्या अडचणी वाढू शकतात. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये भज्जी १६ बळी घेऊन यशस्वी गोलंदाजांच्या यादीत दाखल झाला होता. भज्जी आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक विकेट घेणारा बॉलर आहे. लसिथ मलिंगाने १७०, अमित मिश्राने १५७ आणि भज्जी यांनी १५० विकेट्स घेतल्या आहेत.


हे ही वाचा – IPL : मी युएईमध्ये परतून आयपीएल स्पर्धा खेळण्याची शक्यता नाकारता येत नाही!