घरक्रीडासचिन, युसूफ पाठोपाठ आणखी एक भारतीय क्रिकेटपटू कोरोनाच्या विळख्यात

सचिन, युसूफ पाठोपाठ आणखी एक भारतीय क्रिकेटपटू कोरोनाच्या विळख्यात

Subscribe

देशभरात कोरोनाचा कहर सुरू असून सामान्य माणसांपासून नेते, कलाकार मंडळींना कोरोनाची लागण झाली असताना आता क्रिकेट विश्वातील खेळाडू देखील कोरोनाच्या विळख्यात सापडल्याचे समोर येत आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि युसुफ पठाण यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर सुब्रमण्यम बद्रीनाथला देखील कोरोनाचा संसर्ग झाला आहे. या सर्वांनी नुकताच वर्ल्ड रोड सेफ्टी टी -२० मालिकेत सहभाग घेतला होता. स्वतः बद्रीनाथने कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली आहे. सध्या त्याच्यावर कोरोनाचे उपचार सुरू असून त्याने स्वतःला होम क्वारंटाईन केले असल्याचे सांगितले जात आहे.

वर्ल्ड रोड सेफ्टी टी -२० मालिकेत आतापर्यंत भारतीय टीमच्या तीन खेळाडूंना कोरोनाने संक्रमित केले आहे. यासोबतच इतर अनेक खेळाडूंची कोरोना चाचणी केल्यास त्याचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, बद्रीनाथपूर्वी भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा झाल्याचे त्याने स्वतःच ट्विट करत शनिवारी सांगितले होते. त्याच्या पाठोपाठ भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणलाही कोरोनाची लागण झाली. युसूफनेही स्वतः ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली होती. नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ही स्पर्धा झाली असून या स्पर्धेत सचिन आणि युसूफ भारतीय संघातून एकत्र खेळले होते.

- Advertisement -

बद्रीनाथने आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली असून त्याने असे देखील सांगितले की, मी सर्व आवश्यक खबरदारी घेत होतो. मात्र मी कोरोना चाचणी केली असता माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझ्यात कोरोनाची काही सौम्य लक्षणे दिसली. मी सर्व कोरोना प्रोटोकॉलचे पालन करत असून सध्या होम क्वारंटाईन आहे. माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार काळजी घेत आहे. “, असेही त्याने सांगितले.

- Advertisement -

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -