Wednesday, April 14, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा सचिन तेंडुलकरनंतर आणखी एका क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

सचिन तेंडुलकरनंतर आणखी एका क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

नुकतेच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज स्पर्धेत एकत्र खेळले. 

Related Story

- Advertisement -

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला कोरोनाची बाधा झाल्याचे त्याने स्वतःच ट्विट करत शनिवारी सांगितले. त्याच्या पाठोपाठ आता भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाणलाही कोरोनाची लागण झाली आहे. युसूफनेही स्वतः ट्विटरच्या माध्यमातून याबाबतची माहिती दिली. ‘माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. मला कोरोना झाल्याचे सांगण्यात आल्यावर मी स्वतःला घरीच क्वारंटाईन केले आहे. तसेच योग्य ती औषधे घेत आहे. मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या व्यक्तींनी त्यांची कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो,’ असे युसूफ त्याच्या ट्विटमध्ये म्हणाला. नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत सचिन आणि युसूफ भारतीय संघातून एकत्र खेळले होते.

सचिनलाही कोरोनाची बाधा

- Advertisement -

रायपूर येथे नुकतीच रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज ही स्पर्धा झाली. सचिनने नेतृत्व केलेल्या भारतीय संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. या स्पर्धेत सचिन आणि युसूफ एकत्र खेळले होते. आता या दोघांचाही कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सचिनने कोरोनाची लागण झाल्याची माहिती स्वतःच ट्विटरच्या माध्यमातून दिली. ‘माझा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मला कोरोनाची सौम्य लक्षणे आहेत. माझ्या कुटुंबीयांनीही कोरोना चाचणी करून घेतली असून त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. मी स्वतःला घरीच क्वारंटाईन केले आहे आणि डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करत आहे,’ असे सचिनने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले होते.

- Advertisement -