घरक्रीडाभारतीय संघात मोठे बदल होणार; 'हा' खेळाडू कर्णधार तर..; सुनील गावस्करांची भविष्यवाणी

भारतीय संघात मोठे बदल होणार; ‘हा’ खेळाडू कर्णधार तर..; सुनील गावस्करांची भविष्यवाणी

Subscribe

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर गेला आहे. त्यामुळे आता इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात इंग्लंडने 10 गडी राखून भारताचा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघ टी-20 विश्वचषकातून बाहेर गेला आहे. त्यामुळे आता इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्या टी-20 विश्वचषकाचा अंतिम सामना होणार आहे. परंतु, भारतीय संघाच्या कालच्या पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी भविष्यवाणी करत येत्या काळात भारतीय संघात मोठे बदल होणार असल्याचे म्हटले. तसेच, अनेक दिग्गज खेळाडू निवृत्तीची घोषणा करणार असून, कर्णधारही बदलण्याची शक्यता गावस्करांनी वर्तवली आहे. (After T20 World Cup Loss Said Sunil Gavaskar That Retirements Might Also Be Coming)

सुनील गावस्कर यांच्या भविष्यवाणीनुसार, भारतीय संघाच्या लाइन-अपमध्ये अनेक बदल होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे त्यांनी अष्टपैलू हार्दिक पांड्या भारतीय संघाचा पुढील कर्णधार असल्याचे सांगितले. “विश्वचषकानंतर हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतो. कर्णधार म्हणून हार्दिकने पहिल्याच प्रयत्नात आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. त्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार म्हणून त्याचे नाव समोर येत आहे. हार्दिक निश्चितपणे भविष्यात भारताचा कर्णधार होऊ शकतो आणि काही खेळाडू निवृत्त होतील” असे सुनील गावस्कर यांनी म्हटले.

- Advertisement -

याशिवाय भारतीय संघातील काही खेळाडू निवृत्त होण्याची शक्यताही सुनील गावस्करांनी वर्तवली. “भारतीय संघातील काही खेळाडू 30 ते 40 वर्षाच्यादरम्यान आहेत. हे खेळाडू भारताच्या टी-20 संघातील स्वत:च्या स्थानाबाबत विचार करत असतील. भारताच्या टी-20 क्रिकेट संघात काही महिन्यात मोठ्या प्रमाणावर बदल होतील. रोहित शर्मा, विराट कोहली, रविचंद्रन अश्विन यासारखे वरिष्ठ खेळाडू निरोप घेण्याची शक्यता असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

अश्विन आणि दिनेश कार्तिकचा हा नक्कीच शेवटचा टी-20 वर्ल्ड कप होता. 2 वर्षांनी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप सहभागाबाबत रोहित आणि विराटलाच निर्णयाचा आधिकार असेल, असेही सूत्रांनी सांगितले. मात्र वेस्ट इंडिज-अमेरिकेत संयुक्तपणे होणाऱ्या या स्पर्धेच्यावेळी जवळपास नवा संघ असेल, असे संकेत देण्यात येत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – सानिया मिर्झा आणि शोएब मलिकच्या घटस्फोटावर शिक्कामोर्तब

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -