घर क्रीडा IPL 2023 : ...तर धोनी निवृत्तीची घोषणा करणार? क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी

IPL 2023 : …तर धोनी निवृत्तीची घोषणा करणार? क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाची बातमी

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामाच अंतिम सामना आज होणार आहे. चारवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि गतवर्षीचा आयपीएल विजेता गुजरात टायटन्स संघ या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2023चे जेतेपद पटकावणारा संघ असेल.

इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) 16व्या हंगामाच अंतिम सामना आज होणार आहे. चारवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणारा चेन्नई सुपर किंग्ज संघ आणि गतवर्षीचा आयपीएल विजेता गुजरात टायटन्स संघ या दोन संघांमध्ये अंतिम सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ आयपीएल 2023चे जेतेपद पटकावणारा संघ असेल. एकीकडे नवा चॅम्पियन कोण अशी चर्चा रंगली आहे, तर दुसरीकडे आजचा सामना चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंग धोनीचा अखेरचा सामना असल्याची चर्चा रंगली आहे. (After Winning The Fifth Ipl Title Chennai Captain MS Dhoni Maybe Announce His Retirement)

धोनी आज निवृत्तीची घोषणा करू शकतो?

- Advertisement -

आयपीएलचा (IPL) आजचा अंतिम सामना नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्ज विक्रमी 10व्या IPL फायनलमध्ये खेळत आहे आणि त्यांचे पाचवे विजेतेपद जिंकण्याचा प्रयत्न करतील. धोनीच्या भवितव्याबद्दल अटकळ बांधली जात असताना, आज अहमदाबादमध्ये यलो आर्मीने विजय मिळवला तर 41 वर्षीय धोनी आज निवृत्तीची घोषणा करू शकतो. मात्र, महेंद्र सिंग धोनी या हंगामानंतर आयपीएलमध्ये खेळणार की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सचा पराभव

- Advertisement -

महेंद्र सिंग धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने क्वालिफायर 1 मध्ये गुजरात टायटन्सचा पराभव करून अंतिम फेरीसाठी पात्र ठरले. धोनीने सामन्यानंतर सांगितले की, त्याच्या खेळाच्या कारकिर्दीचे काय करायचे याचा विचार करण्यासाठी त्याच्याकडे अजून 8 ते 9 महिने आहेत.

धोनी गुडघ्याच्या समस्येने त्रस्त

दरम्यान, महेंद्र सिंग धोनी गुडघ्याच्या समस्येने त्रस्त आहे. आयपीएल 2023 मध्येही तो यामुळे खूप अस्वस्थ होताना दिसत होता. 28 मे रोजी आयपीएल 2023 च्या फायनलनंतर धोनीला परिस्थितीवर विचार करण्यासाठी थोडा वेळ मिळेल.


हेही वाचा – IPL 2023 Final : गुजरात टायटन्सचं पारडं भारी? आकडेवारी हेच सांगते!

- Advertisment -