घरक्रीडाIPL 2023 : ठरलं! यंदा 'हा' खेळाडू करणार हैदराबादच्या संघाचे नेतृत्व

IPL 2023 : ठरलं! यंदा ‘हा’ खेळाडू करणार हैदराबादच्या संघाचे नेतृत्व

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएल स्पर्धेला अवघ्या एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असून, खेळाडूंनीही सरावाला सुरूवात केली आहे. अशातच अनेक संघांना यंदाचे आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी संघाचे नेतृत्व कार्यक्षम खेळाडूकडे सोपवले आहे.

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 15 व्या पर्वाला 31 मार्चपासून सुरूवात होणार आहे. आयपीएल स्पर्धेला अवघ्या एका महिन्याचा कालावधी शिल्लक राहिला असून, खेळाडूंनीही सरावाला सुरूवात केली आहे. अशातच अनेक संघांना यंदाचे आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी संघाचे नेतृत्व कार्यक्षम खेळाडूकडे सोपवले आहे. अशातच सनरायजर्स हैदराबाद संघाने आपल्या नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे. दक्षिण अफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू एडन मारक्रम याच्याकडे हैदराबाद संघानं कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली आहे. (Aiden Markram Appointed New Captain of Sunrisers Hyderabad for IPL 2023 season)

हैदराबादच्या संघाने ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. एडन मारक्रम याने नुकतीच दक्षिण अफ्रिका टी20 फ्रेंचायजी लीगमध्ये (SA20) सनरायजर्स फ्रेंचायजीचे नेतृत्व केले होते. त्याच्या नेतृत्वात सनरायजर्स फ्रेंचायजीने जेतेपद पटकावले. 6 संघामध्ये ही स्पर्धा रंगली होती. यामध्ये सनरायजर्स ईस्टर्न कॅप संघाची कामगिरी जबरदस्त होती. 6 संघामध्ये रंगलेल्या या स्पर्धेत मारक्रमच्या संघाने बाजी मारली.

- Advertisement -

या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सनरायजर्स फ्रेंचाइजीने प्रिटोरिया कॅपिटल्सचा पराभव करत जेतेपद पटकावले. दक्षिण अफ्रिका टी20 फ्रेंचायजी लीगमध्ये आपल्या संघाची कामगिरी पाहाता सनराजयर्स हैदराबाद संघाने आयपीएलमध्ये एडन मारक्रम याच्याकडे जबाबदारी सोपवली.

अष्टपैलू खेळाडू एडन मारक्रमची कामगिरी

- Advertisement -
  • एडन मारक्रम याने IPL च्या मागील हंगमात हैदराबादसाठी विस्फोटक फलंदाजी केली आहे.
  • मारक्रम याने आयपीएल 2022 मध्ये 47.63 च्या सरासरीने आणि 139 च्या स्ट्राइक रेटने 381 धावांचा पाऊस पाडला होता.
  • 2021 मध्ये IPL पदार्पण करणाऱ्या मारक्रम याने आतापर्यंत आयपीएलमध्ये 20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 527 धावा चोपल्या आहेत.

आयपीएलच्या सर्व संघाचे कर्णधार

  • सनरायजर्स हैदराबाद – एडन मारक्रम
  • रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर – फाफ डु प्लेसिस
  • चेन्नई सुपर किंग्स – महेंद्र सिंह धोनी
  • कोलकाता नाइट रायडर्स – श्रेयस अय्यर
  • पंजाब किंग्स – शिखर धवन
  • दिल्ली कॅपिटल्स – ऋषभ पंत
  • राजस्थान रॉयल्स – संजू सॅमसन
  • मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा
  • लखनौ सुपर जायंट्स – केएल राहुल
  • गुजरात टायटन्स- हार्दिक पांड्या

कधीपासून सुरू होणार आयपीएल स्पर्धा

  • 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे.
  • गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे.
  • 21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत.
  • 28 मे रोजी आयपीएल 2023 चा अंतिम सामना होणार आहे.
  • आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत.
  • लीग राऊंडमध्ये 10 संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहे.
  • 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत.
  • आयपीएल 2023 चे आयोजन भारतातच होणार आहे.
  • देशभरातील 12 मैदानावर सामने रंगणार आहेत.
  • 10 संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे.

अ ग्रुप

मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे.

ब ग्रुप

चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.


हेही वाचा – ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारताला मोठा धक्का, स्टार खेळाडू संघाबाहेर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -