घरक्रीडाअजिंक्यतारा

अजिंक्यतारा

Subscribe

अ‍ॅडलेडच्या कसोटीत ३६ ची नीचांकी धावसंख्या गाठून ४६ वर्षांपूर्वीचा ४२ धावांचा नीचांक मोडीत निघाला. या सार्‍यांचा विचार करता अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच खडे चारुन मालिकेत बरोबरी साधल्यामुळे बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडेच राखण्याची संधी भारताला लाभली आहे. विराट कोहली भारतात माघारी परतल्यामुळे अजिंक्याला बदली कर्णधाराची भूमिका बजवावी लागली. याआधी धरमशाला, बंगलोर आणि आता मेलबर्न कसोटीत अजिंक्यने बदली कर्णधाराची भूमिका पार पाडताना निर्भेळ यश संपादले आहे. तिन्ही कसोटीत (त्यापैकी ऑस्ट्रेलियावर दोनदा) त्याने विजय संपादले. अजिंक्यने कर्णधाराला साजेशी शतकी खेळी केली. शिवाय क्षेत्रव्यूह रचनेत त्याची कल्पकता दिसून आली.

अ‍ॅडलेडमधील ३६ धावांच्या वस्त्रहरणानंतर मेलबर्न कसोटीत ऑस्ट्रेलियावर ८ विकेट्सनी विजय मिळवून अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधून सर्वांनाच आश्चर्याचा धक्क दिला. भारतीय क्रिकेट रसिकांसाठी हा धक्का सुखदच होता. भारतीय क्रिकेटमध्ये असे सुखद धक्के क्वचितच अनुभवायला मिळतात. (लक्ष्मण-राहुल द्रविड यांच्या दमदार त्रिशतकी भागीमुळे कोलकत्याच्या ईडन गार्डन्सवर गांगुलीच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून मालिकेत बरोबरी साधली. मद्रासची निर्णायक कसोटी जिंकून भारताने मालिकेत २-१ अशी सरशी साधली. कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील हा दुर्मिळ मालिका विजय. फॉलोऑनच्या नामुष्कीनंतर केवळ कसोटीच नव्हे तर मालिका जिंकण्याचा पराक्रम भारताने केला. माझ्या मते भारतीय क्रिकेट इतिहासातील हा सर्वोत्तम विजय) भारतीय संघाचे (बढाईखोर) प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ‘मेलबर्नमधील विजय भारतीय क्रिकेटमधील सर्वोत्तम विजय’ असे सांगितले.

अ‍ॅडलेडच्या कसोटीत ३६ ची नीचांकी धावसंख्या गाठून ४६ वर्षांपूर्वीचा ४२ धावांचा नीचांक मोडीत निघाला. या सार्‍यांचा विचार करता अजिंक्य रहाणेच्या भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियातच खडे चारुन मालिकेत बरोबरी साधल्यामुळे बॉर्डर-गावस्कर करंडक आपल्याकडेच राखण्याची संधी भारताला लाभली आहे. विराट कोहली भारतात माघारी परतल्यामुळे अजिंक्याला बदली कर्णधाराची भूमिका बजवावी लागली. याआधी धरमशाला, बंगलोर आणि आता मेलबर्न कसोटीत अजिंक्यने बदली कर्णधाराची भूमिका पार पाडताना निर्भेळ यश संपादले आहे. तिन्ही कसोटीत (त्यापैकी ऑस्ट्रेलियावर दोनदा) त्याने विजय संपादले. अजिंक्यने कर्णधाराला साजेशी शतकी खेळी केली. शिवाय क्षेत्रव्यूह रचनेत त्याची कल्पकता दिसून आली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांना लेग-ट्रॅपमध्ये अडकवण्याचे त्याचे डावपेच विलक्षण यशस्वी ठरले. त्याच्या या कल्पक डावपेचांवर बुजुर्ग कर्णधार (रिकी पॉटिंग-सुनील गावस्कर) बेहद्द खूश होते.

- Advertisement -

भारतीय कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवणारा अजिंक्य रहाणे हा नववा मुंबईकर कर्णधार. क्रिकेटपटूंना आता सर्व सोयीसुविधा मिळत असल्यातरी शालेय जीवनात अजिंक्य दररोज डोंबिवलीवरुन लोकलने प्रवास करण्याचा ते देखील क्रिकेट किटची मोठी बॅग घेऊन प्रवास करणे किती कठीण असते त्याची मुंबईकरांना कल्पना आहेच. गंभीर मुद्रा धारण करणार्‍या दाढीधारी अजिंक्य रहाणेच्या चेहर्‍यावर स्मित हास्य अभावानेच उमटते असे काही जणांना वाटते. खास करुन त्याने ज्यांच्याकडून कर्णधार पदाची सूत्रे हाती घेतली तो विराट कोहली हा तर सदैव आपल्या चेहर्‍यावर हावभाव दर्शवणारा! अजिंक्य शांत असतो तो आपल्या भावना प्रकट करत नाही. अबोल अजिंक्यची बॅटच बोलते अन् याची प्रचिती मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर (एमसीजी) ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना निश्चितच आली. स्टार्क, कमिन्स, हेझलवूड या तेज त्रिकुटासह लायनच्या फिरकीचा यथेच्छ समाचार घेत रहाणेने हनुमा  विहारी, रिषभ पंत यांच्यासह छोट्या पण उपयुक्त भागिदार्‍या केल्या आणि रवींद्र जडेजाच्या साथीने शतकी भागिदारी करुन ऑस्ट्रेलियन आक्रमणातील हवाच काढून घेतली.

कोहलीची प्रतिमा अमिताभच्या ‘अ‍ॅग्री यंग मॅन’ प्रमाणे असून अजिंक्य हा मराठमोळ्या, सीधासाध्या अमोल पोलकर सारखा. अमिताभच्या हीट चित्रपटांच्या लाटेतही अमोल पालेकरचे चित्रपट चालले. मध्यमवर्गीय माणसांप्रमाणे इमानदार, सच्चा नेक आदमी हा अमोल पालेकरांचा पडद्यावरील आविष्कार प्रेक्षकांना भावला. ‘बॉय नेक्स्ट डोअर’ असं अमोेलबाबत म्हटलं जायचं. अजिंक्य ही शांत, सोज्वळ, मैदानावर कधीही त्रागा न करणारा असा ‘मुंबईकर’ खडूस खेळाडू. अमिताभ-कोहली यांच्या देहबोलीवर प्रेक्षक फिदा परंतु, ऑस्ट्रेलियातील उर्वरित ३ कसोटीसाठी भारतीय संघाच्या नेतृत्वाची धुरा अजिंक्याच्या हाती सोपविण्यात आली आहे.

- Advertisement -

कोहलीपाठोपाठ तेज गोलंदाज महम्मद शमी दुखापतीमुळे मायदेशी परतला. भरीस भर म्हणून उमेश यादवलाही पोटर्‍या दुखावल्यामुळे पुढच्या कसोटीला मुकावे लागले.  त्याच्याऐवजी तामिळनाडूचा डावखुरा तेज गोलंदाज टी. नटराजन याला संधी देण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी भारताने ऑस्टे्रलियात प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. या विजयाचे शिल्पकार होते जसप्रीत भुमरा, महम्मद शमी, ईशांत शर्मा या तेज त्रिकूटाने ४८ मोहरे टिपले. परंतु आता केवळ जसप्रीत भुमरा ऑस्ट्रेलियात आहे. शमी, यादव, ईशांत शर्मा हे रहाणेच्या दिमतीला नाहीत. परंतु यामुळे अजिंक्य नाउमेद झालेला नाही. ऑस्ट्रेलियात यंदाही अजिंक्य राहण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील याची पूर्ण जाणीव अजिंक्यला असून त्याची झलक एमसीजीवर दिसून आली.

संघात बदल अटळ होते. अजिंक्यने पाच गोलंदाज खेळवण्याचा निर्णय घेतला.  हैदराबादचा तेज गोलंदाज सिराज तसेच पंजाबचा युवा सलामीवीर शुभमन गिल या युवा खेळाडूंंना कसोटी पदार्पणाची संधी दिली त्याची ही खेळी विलक्षण यशस्वी ठरली. कसोटी पदार्पणात गिलने खेळपट्टीवर टिकून राहण्याची क्षमता दाखवली. ४५ आणि नाबाद ३५ धावांच्या खेळी दरम्यान या पंजाबी युवकाने मारलेले फटके (चौकार) बेहतरीन होते. परदेशातील खेळपथ्यावर ऑस्ट्रेलियन तेज. त्रिकुटासमोर तो धैर्याने उभा राहिला. हे भारतीय क्रिकेटसाठी ‘शुभ वर्तमान’.

सिराजने कसोटी पदार्पणात ५ मोहरे टिपले अन् आपली छाप पाडली. महिनाभरापूर्वी पितृछत्र हरपलेल्या सिराजची कामगिरी कौतुकास्पदच. पांढर्‍या चेंडूप्रमाणे कुकाबुराच्या लाल चेंडूवरही या हैदराबादी युवकाने कांगारुंना सतावले.
वृध्दिमान सहाऐवजी यष्टीरक्षणाची जबाबदारी रिषभ पंतवर सोपवण्यात आली. कामचलाऊ यष्टिरक्षकाची भूमिका पार पाडणार्‍या पंतने फलंदाजीत आपलं कर्तव्य चोखपणे पार पाडले.  त्याच्या २९ धावांच्या खेळीने ऑस्टे्रलियाचे आक्रमण खिळखिळे केले. खेळपट्टीवर पंतचे आगमन झाल्यावर भारतीय धावगतीला (रनरेट) वेग आला. यष्टिरक्षक-कर्णधार टिम पेनला क्षेत्ररक्षक पांगवावे लागले.

आपल्या युवा साथीदाराकडून स्फूर्ती घेणार्‍या कर्णधार रहाणेचा खेळही बहरला. अष्टपैलू रवींद्र जाडेजाची निवड हा कर्णधार अजिंक्यचा ‘मास्टरस्ट्रोक’. जाडेजाने आपल्या सुवर्णमहोत्सवी (अर्धशतकी) कसोटी खेळताना कर्णधार रहाणेला तोलामोलाची साथ देत शतकी भागीदारी रचली, त्यात जाडेजाचा वाटा ५७ धावांचा (अर्धशतक साजरे करण्याच्या नादात त्याने कर्णधार रहाणेला धावचीत केले) त्याची डावखुरी फिरकी अश्विनला पूरक ठरली. या फिरकी जोडगोळीने ऑस्टे्रलियाच्या धावसंख्येला खिळ घातली शिवाय मोक्याच्या क्षणी ब्रेक थ्रू मिळवून दिल्यामुळे अजिंक्य इतके डावपेच फलद्रूप झाले.

कोहली कर्णधार तर अजिंक्य उपकर्णधार, धोनीच्या निवृत्तीनंतर ही जोडगोळी भारतीय क्रिकेटची धुरा समर्थपणे सांभाळली आहे. कसोटी, वनडे, टी-२० क्रिकेटमध्ये भारतीय संघ अव्वल तिघांत आहे. डोंबिवली-मुलुंड-दादर असा अजिंक्यचा प्रवास.  कूचबिहार करंडक क्रिकेट स्पर्धेत (१९ वर्षाखालील) मुंबईचे नेतृत्व करणार्‍या अजिंक्यला क्रिकेटचे बाळकडू मुंबईतील विविध मैदानात खेळताना (आंतरशालेय, इंटर कॉलेजीएट, विविध वयोगटाच्या स्पर्धा) मिळाले. भारतातील विविध स्टेडियमवर प्रथम श्रेणी क्रिकेट (रणजी, दुलीप, देवधर, चॅलेंजर, मुश्ताक अली, इराणी तसेच महमद निस्सार ट्रॉफी स्पर्धेतील) समृध्द अनुभवानंतर झिंबाब्वे दौर्‍यात भारतीय वनडे तसेच टी-२० संघाचे नेतृत्व करण्याची संधी त्याला लाभली.

‘गोलंदाजांचा कर्णधार’ अशी अजिंक्याची इमेज झाली. आपल्या गोलंदाजांवर पूर्ण भरवसा ठेवण्याची त्याची हातोटी विलक्षणच अनेकदा चुरशीच्या लढतीत गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीमुळे अजिंक्यने संघाला निसटते विजय मिळवून दिले. कुठल्याही वादापासून दूर रहाणेच तो पसंत करतो. परंतु आपल्या भावनांचा जाहीर प्रदर्शन करणे तो टाळतो याबाबत तो राहुल द्रविडच्या पंथातला खेळाडू. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून द्रविडच्या साथीने तो खेळला.

आक्रमकता हा दोघांचाही स्थायीभाव नाही. स्थितप्रज्ञाप्रमाणे तो वावरतो. खिलाडूवृत्ती मात्र त्याच्यात पुरेपूर आहे. कोहलीच्या गैरहजेरीत चिन्नास्वामी स्टेडियमवर अफगाणिस्तान विरुध्दच्या कसोटीत अजिंक्यने भारताचे नेतृत्व केले. नवशिक्या, नवोदित अफगाणिस्तानवर भारताने डावाने विजय संपादला तो दुस-या दिवशीच. बक्षीस समारंभप्रसंगी अजिंक्यने नवोदित अफगाणी खेळाडूंच्या हातात झळाळता करंडक ‘ट्रॉफी’ सोपविली आणि त्यांच्याबरोबर फोटोही काढला. त्याच्या या कृतीने अफगाणिस्तानचे खेळाडू भारावले. प्रतिस्पर्ध्यांच्या खेळाची कदर करणार्‍या अजिंक्यला सलाम.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -