घरक्रीडाअजिंक्य रहाणेला १२ लाखांचा दंड, स्लो ओव्हर पडल्या भारी!

अजिंक्य रहाणेला १२ लाखांचा दंड, स्लो ओव्हर पडल्या भारी!

Subscribe
रविवारी मुंबईविरूद्ध झालेल्या सामन्यात मर्यादित वेळेत ओव्हर पूर्ण न केल्यामुळं राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणेला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या सत्रातील राजस्थान रॉयल्स संघावर दाखल करण्यात आलेला हा पहिलाच गुन्हा आहे. राहणेच्या नेतृत्वाखाली राजस्थान रॉयल्सने काल मुंबई इंडियन्सवर सात विकेट राखून विजय मिळवला. या विजयासह राजस्थानच्या प्ले ऑफच्या आशा कायम राहिल्या आहेत.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन अजिंक्य रहाणेला ओव्हर स्लो टाकल्यामुळे आयपीएलच्या नियमाप्रमाणे दोषी ठरविण्यात आले. नियमाचा भंग केल्यामुळे त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.
आहे. आयपीएलच्या नियमाअंतर्गत किमान ओव्हर-रेटमध्ये राजस्थान संघाने त्यांच्या ओव्हर पूर्ण केल्या नाहीत. याप्रकरणी कर्णधार अजिंक्य रहाणेला १२ लाखांचा दंड  ठोठावण्यात आला.
राजस्थानचा ‘रॉयल’ विजय 
प्रथम फलंदाजी करताना मुंबईने २० षटकांत ६ बाद १६८ धावांची समाधानकारक मजल मारली. आक्रमक सुरुवातीनंतर मोक्याच्या वेळी राजस्थानने दिलेल्या धक्क्यांमुळे मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या गाठता आली नाही. या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलरच्या नाबाद ९४ धवांच्या खेळीच्या बळावर राजस्थानने सात विकेटने विजय मिळवला
यासह राजस्थानने गुणतालिकेत पाचवे स्थान मिळवताना प्लेआॅफच्या आशा कायम राखल्या आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -