घरक्रीडाAjinkya Rahane : चांगली कामगिरी करुनही ODI मधून वगळले, अजिंक्य रहाणेकडून नाराजी...

Ajinkya Rahane : चांगली कामगिरी करुनही ODI मधून वगळले, अजिंक्य रहाणेकडून नाराजी व्यक्त

Subscribe

भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे मागील 12 महिन्यांपासून आपल्या खराब कामगिरीमुळे मागे पडला आहे. 2021 वर्षात अजिंक्य रहाणेने 13 कसोटी सामन्यात केवळ ४७९ धावा केल्या आहेत. तसेच त्याला क्रिकेटमधील मोठ्या प्रकाराच्या टीम कर्णधारपदावरुन काढण्यात आले आहे. तसेच आता कसोटी सामन्यातही त्याच्या जागेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.

यंदाच्या वर्षात अजिंक्य रहाणने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी सामने खेळले आहेत. तसेच चांगली कामगिरी करु शकले नाही. यावेळी अजिंक्य रहाणेने चार डावांमध्ये एक अर्धशतकासह ६८ धावा केल्या आहेत. कसोटी फॉरमॅटमधील खराब कामगिरीबाबत अजिंक्य रहाणे म्हणाला की, खेळाच्या वेळेअभावी फलंदाजी करण्यावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे भारतातील अनेक देशांतर्गत स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

भारताचा स्टार क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेने एका मुलाखतीदरम्यान म्हटलं आहे की, जेव्हा तुम्ही फक्त एकच फॉरमॅटमध्ये खेळता, विशेष म्हणजे गेल्या २ ते ३ वर्षांमध्ये रणजी क्रिकेट नाही आणि कोणताही देशांतर्गत सामना नाही. त्यामुळे मला असं वाटत आहे की, या गोष्टी धान्यात ठेवल्या पाहिजेत कारण तु्म्ही घरी राहून धावा करु शकत नाही. तुम्ही कितीही अभ्यास करा किंवा कितीही सत्र असले तरी त्यामुळे आत्मविश्वास मिळणार नाही. आत्मविश्वास खेळ आणि सामन्यात धावा करण्यामुळे य़ेत असतात. रणजी ट्रॉफी शेवटच्या वेळी २०१९-२० मध्ये आयोजित करण्यात आली होती. तर २०२०-२१ चे सामने कोरोनामुळे रद्द करण्यात आले होते.

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागल्यामुळे यंदाचे सामने उशीराने सुरु करण्यात येत आहेत. आता रणजी ट्रॉफी १७ फेब्रुवारीपासून सुरु होणार आहे. रहाणेने एकदिवसीय सामन्यात चांगले प्रदर्शन करुनही त्याला संघातून वगळण्यात आले आहे.

- Advertisement -

यापूर्वी भारतीय संघासाठी एकदिवसीय सामने खेळत होतो आणि चांगले प्रदर्शनही करत होतो. अचानक खेळी कमी झाली आहे. परंतु भूतकाळात जायचे नाही. 2014, 15, 16, आणि १७ च्या एकदिवसीय आणि कसोटी सामन्यांमध्ये चांगले प्रदर्शन केलं आहे. यानंतर मला खेळण्यास मिळाले नाही यामुळे कसोटी सामन्यात अंतर पडले असे अजिंक्य रहाणे म्हणाला.


हेही वाचा : IPL Auction 2022 : IPL खेळाडूंचे उद्यापासून मेगा ऑक्शन, कोणाला संधी?, वेळेसह खर्चाचीही माहिती

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -