Thursday, April 15, 2021
27 C
Mumbai
घर क्रीडा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणे म्हणजे वर्ल्ड कप जिंकण्यासमान - अजिंक्य राहणे

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणे म्हणजे वर्ल्ड कप जिंकण्यासमान – अजिंक्य राहणे

गेल्या दोन वर्षांपासून आम्ही भारतात बरेच सामने खेळलो नाही.

Related Story

- Advertisement -

भारत आणि इग्लंडमध्ये सुरु असलेल्या ४ कसोटी सामन्यांपैकी शेवटचा सामना अहमदाबादमध्ये ४ मार्च (गुरुवार) खेळवला जाणार आहे. अशी माहिती भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणेने दिली आहे. भारतीय संघाने अखेरचा सामना जिंकूण वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. चौथा सामन्यात बरोबरी झाली तरी भारतीय संघ अंतिम फेरीत जाणे निश्चित झाले आहे कारण इग्लंड अंतिम फेरीतून बाहेर पडली आहे. भारतीय संघाचा उपरकर्णधार अजिंक्य राहणेने म्हटले आहे की, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणे आमच्यासाठी वर्ल्ड कप जिंकण्यासमान आहे. हा सामना जिंकण्यासाठी आम्ही खूप तयारी केली आहे.

भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य राहणने टेस्ट चॅम्पियनशिपला वर्ल्ड कप म्हणून संबोधले आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकणे आमच्यासाठी वर्ल्ड कप जिंकण्यासमान आहे. आत्ता आमचे लक्ष इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना खेळण्यावर आहे. इशांत शर्माची तबेतही पूर्णपणे ठीक आहे.

- Advertisement -

इंग्लंडविरुद्ध खेळण्यात येणाऱ्या ४ कसोटी सामन्यांत अजिंक्य राहणेने आतापर्यंत ८५ धावा काढल्या आहेत. यामध्ये राहणेचा सर्वाधिक स्कोर ६७ रनांचा आहे जो चेन्नईमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या सामन्यात केला होता. यापूर्वी अहमदाबाद येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात भारताने इंग्लंडला १० गडी राखून नमवून २-१अशी आघाडी घेतली होती. जेव्हा आपण स्पिनर खेळपट्टीवर खेळतो तेव्हा आपल्याला चेंडूच्या पट्टीवर खेळावे लागते आणि आपल्याला ही गोष्ट चांगली माहित आहे की, गेल्या दोन वर्षांपासून आम्ही भारतात बरेच सामने खेळलो नाही.

- Advertisement -