घरक्रीडाIND vs AUS : प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने केलेल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक!

IND vs AUS : प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने केलेल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक!

Subscribe

शेन वॉर्नने अजिंक्य रहाणेची स्तुती केली.  

भारताचा कर्णधार अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग-डे कसोटीच्या पहिल्या डावात ११२ धावांची खेळी केली. रहाणेचे हे कसोटी क्रिकेटमधील १२ वे शतक ठरले. रहाणे फलंदाजीला मैदानात उतरला, तेव्हा भारताची २ बाद ६१ अशी धावसंख्या होती. मात्र, त्याच्या शतकामुळे भारताने पहिल्या डावात ३२६ धावांची मजल मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा महान क्रिकेटपटू रहाणेचे कौतुक केले. ‘रहाणेचे शतक हे ऑस्ट्रेलियात कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराने केलेल्या सर्वोत्तम शतकांपैकी एक होते,’ असे वॉर्नने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले.

गावस्करांनीही केले कौतुक  

वॉर्नच्या आधी भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनीही रहाणेचे कौतुक केले होते. रहाणेचे शतक भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात महत्वाच्या शतकांपैकी एक असल्याचे गावस्कर म्हणाले होते. रहाणेने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उत्कृष्ट फलंदाजी केली होती. त्याने पहिल्या दोन सत्रांत सावध फलंदाजी केली, पण खेळपट्टीवर वेळ घालवल्यावर त्याने धावांची गती वाढवली. अखेर तिसऱ्या दिवशी तो ११२ धावांवर धावचीत झाला. त्याने ही खेळी २२३ चेंडूत १२ चौकारांच्या मदतीने केली.

- Advertisement -

लॉर्ड्सवरील शतक सर्वोत्तम

मेलबर्न कसोटीत कर्णधार म्हणून केलेल्या शतकापेक्षाही लॉर्ड्सच्या मैदानावर २०१४ मध्ये केलेले शतक माझ्यासाठी अधिक खास होते, असे रहाणे तिसऱ्या दिवसाच्या खेळानंतर म्हणाला. ‘हे शतक माझ्यासाठी खास आहे. शतक झळकावणे हे कधीही खासच असते. मात्र, माझे सर्वोत्तम शतक अजूनही लॉर्ड्सवर इंग्लंडविरुद्ध आले होते असे मला वाटते,’ असे रहाणेने नमूद केले. रहाणेने २०१४ मध्ये इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्सवर १०३ धावांची खेळी केली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -