घरक्रीडाIND vs AUS : 'त्या' निर्णयासाठी अजिंक्य रहाणेचे कौतुक करावे तितके कमी -...

IND vs AUS : ‘त्या’ निर्णयासाठी अजिंक्य रहाणेचे कौतुक करावे तितके कमी – हॅडीन

Subscribe

मेलबर्न कसोटी जिंकल्यानंतर भारताने सिडनी कसोटी अनिर्णित राखली. 

मेलबर्न आणि खासकरून सिडनी कसोटीत अजिंक्य रहाणेने कर्णधार म्हणून केलेली कामगिरी कौतुकास्पद होती, असे विधान ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक ब्रॅड हॅडीनने केले. भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतल्यानंतर रहाणेने भारताच्या नेतृत्वाची धुरा सांभाळली. त्याच्या नेतृत्वात भारताने मेलबर्न कसोटीत विजय मिळवत मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर झालेली सिडनी कसोटी त्यांनी अनिर्णित राखली. या कसोटीच्या दुसऱ्या डावात रहाणेने रिषभ पंतला पाचव्या क्रमांकावर बढती देण्याचा निर्णय घेतला आणि पंतने ९७ धावांची खेळी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांवर दबाव टाकला. पंतबाबत घेतलेल्या या निर्णयासाठी रहाणेचे कौतुक करावे तितके कमी आहे, असे हॅडीन म्हणाला.

भारतीय संघ सिडनी कसोटी अनिर्णित राखेल असे मला वाटले नव्हते. भारतीय संघ सुरुवातीपासून सामना अनिर्णित राखण्यासाठी खेळू शकला असता. मात्र, सुरुवातीला त्यांनी सामना जिंकण्याचा विचार केला. पंतला बढती देण्याचा अजिंक्य रहाणेचा निर्णय फारच उत्कृष्ट होता. त्याने पंतला वरच्या क्रमांकावर पाठवून आक्रमकता दाखवली. त्याने आक्रमक निर्णय घेऊन ऑस्ट्रेलियन कर्णधार टीम पेनवर दबाव टाकला. त्यामुळे पेनने चुका करण्यास सुरुवात केली. कर्णधार म्हणून रहाणेचे कौतुक झाले पाहिजे. पंत बाद झाल्यावर भारताने सामना अनिर्णित ठेवण्यासाठी खेळ केला. हनुमा विहारी आणि चेतेश्वर पुजारा यांनी संयमाने खेळ करत त्यांना दिलेली जबाबदारी चोख बजावली, असे हॅडीनने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -