Thursday, March 27, 2025
27 C
Mumbai
Homeक्रीडाKKR Captain 2025 : कोलकाता संघाचा कर्णधार ठरला, शाहरुखने मराठमोळ्या खेळाडूकडे दिले नेतृत्व

KKR Captain 2025 : कोलकाता संघाचा कर्णधार ठरला, शाहरुखने मराठमोळ्या खेळाडूकडे दिले नेतृत्व

Subscribe

आयपीएलच्या थराराला सुरुवात होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मराठमोळ्या कर्णधाराकडे आपल्या संघाचे नेृतृत्व सोपविले आहे. यासंदर्भात संघाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025 Schedule Announced) 2025 ला या महिन्यात 22 मार्ज रोजी सुरुवात होणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाच्या सामन्याने 18 व्या हंगामाला सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या थराराला सुरुवात होण्याआधीच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाबाबत मोठी माहिती समोर येत आहे. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानने मराठमोळ्या कर्णधाराकडे आपल्या संघाचे नेृतृत्व सोपविले आहे. यासंदर्भात संघाकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. (Ajinkya Rahane to lead Kolkata Knight Riders in the 18th season of IPL 2025)

18 व्या हंगामाचा पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात ईडन गार्डन्सच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहे. या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतानाच संघाने आता मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे याच्याकडे कर्णधारपद सोपविले आहे. तर व्यंकटेश अय्यर याच्याकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाचे सीईओ व्यंकी मैसूर यांनी यासंदर्भात घोषणा केली आहे.

हेही वाचा – IND vs NZ : कोणत्याही कर्णधाराने पहिल्यांदा फलंदाजीच घेतली असती, माजी क्रिकेटपटूची न्यूझीलंडवर टीका

कोलकाता संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे याने आनंद व्यक्त केला आहे. त्याने म्हटले की, कोलकाता संघाचे नेतृत्व करण्यासाठी विचारणा होणे, हीच माझ्यासाठी फार अभिमानाची बाब आहे. केकेआर संघ आपयीएलच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी संघांपैकी एक आहे. आमच्या संघामध्ये सर्व प्रकारचे खेळाडू असल्याने आमचा संघ हा उत्कृष्ट आहे. त्यामुळे मी प्रत्येकासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे, अशी प्रतिक्रिया अजिंक्य राहणे याने दिली.

म्हणून अजिंक्य रहाणेची कर्णधारपदी निवड

अनुभवी अजिंक्य रहाणे याने यापूर्वी आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रायझिंग पुणे सुपरजायंट्स, दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय त्याने  आयपीएल स्पर्धेत 185 सामन्यांमध्ये 4642 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 शतक आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे अजिंक्य रहाणे याने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत मुंबईला जेतेपद जिंकवून दिले आहे. या त्याने सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत 58.62च्या सरासरीने आणि 164.56 स्ट्राईकरेटने 469 धावा केल्या आहेत. त्यामुळे अजिंक्य रहाणे याचा अनुभव कोलकाता संघाला फायदेशीर ठरू शकतो. याचपार्श्वभूमीवर त्याच्या कोलकाता संघाचे कर्णधारपद सोपविण्यात आले आहे.

हेही वाचा – Champions Trophy : आयसीसीला उत्तर द्यावे लागेल; उपांत्य फेरीआधी विवियन रिचर्ड्सकडून हा मुद्दा उपस्थित