घरक्रीडाऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धा

Subscribe

भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू सायना नेहवालचे ऑल इंग्लंड स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले आहे. या फेरीत तिचा जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या तैवानच्या ताई झू यिंगने १५-२१, १९-२१ असा सरळ गेममध्ये पराभव केला. सायना आणि यिंगमध्ये आतापर्यंत २० सामने झाले आहेत. यापैकी आता १५ सामने यिंगने जिंकले आहेत, तर सायनाला अवघे ५ सामने जिंकता आले आहेत. सायनाला २०१३ पासून यिंग हरवता आलेले नाही.

उपांत्यपूर्व फेरीतील या सामन्याची सुरुवात ताई झू यिंगने अप्रतिमरीत्या केली. त्यामुळे पहिल्या गेमच्या मध्यांतराला तिच्याकडे ११-३ अशी मोठी आघाडी होती. मध्यांतरानंतर मात्र सायनाने दमदार पुनरागमन केले. तिने पुढील १२ पैकी ९ गुण जिंकत यिंगची आघाडी १२-१४ अशी कमी केली. पण, यिंगने पुन्हा एकदा आपला खेळ उंचावत २०-१३ अशी आघाडी मिळवली. सायनाने यापुढील २ गुण मिळवले. मात्र, पुढचा गुण यिंगने जिंकत पहिला गेम आपल्या नावे केला.

- Advertisement -

दुसर्‍या गेममध्ये सायना आपल्या खेळात सुधारणा करेल अशी अपेक्षा होती आणि तसेच झाले. तिने चांगली सुरुवात करत ८-३ अशी ५ गुणांची आघाडी मिळवली. मध्यांतरापर्यंत सायनाने ११-८ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, मध्यांतरानंतर यिंगने आक्रमक फटके मारत १७-१५ अशी आघाडी घेतली. सायनाने पुनरागमन करत १९-१९ अशी बरोबरी केली होती. पुढे सायनाने मारलेले बॅकहँड फटक्यांचे दमदार प्रतिउत्तर देत यिंगने हा गेम २१-१९ असा जिंकत सायनाला स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -