घरक्रीडाअखिल भारतीय मेजर पोर्ट व्हॉलीबॉल स्पर्धा

अखिल भारतीय मेजर पोर्ट व्हॉलीबॉल स्पर्धा

Subscribe

मुंबई बंदर, कोचीनची विजयी सुरुवात

मुंबई बंदर, प्रदीप पोर्ट, कोचीन पोर्ट या संघांनी अखिल भारतीय मेजर पोर्ट व्हॉलीबॉल स्पर्धेची विजयी सुरुवात केली आहे. वडाळा येथे सुरू झालेल्या या स्पर्धेत ९ संघांनी सहभाग घेतला आहे.

मुंबईने ब गटात चेन्नई पोर्टचा २५-१३, २५-०६, २५-०९ असा सरळ सेटमध्ये पराभव करत पहिल्या साखळी विजयाची नोंद केली. या सामन्यात सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व प्रस्थापित करत मुंबई बंदरने हा सामना सहजपणे जिंकला. याच गटात तुतीकोरिन पोर्टने मार्मागोवा पोर्टचा २५-०६, २५-११, २५-१२ असा सहज पराभव केला.

- Advertisement -

अ गटात प्रदीप पोर्टने वैजाख पोर्टला २५-१२, २५-२०, २५- १४ असे नमवले. या सामन्यात दुसर्‍या सेटमध्ये वैजाख पोर्टने प्रदीपला कडवी लढत दिली. मात्र, प्रदीपने योग्य वेळी आपला खेळ उंचावत हा सेट जिंकला. याच गटात कोचीन पोर्टने मंगलोर पोर्टला २५-१०, २५-१५, २५-१४ असे पराभूत करत आगेकूच केली. या स्पर्धेचे उदघाटन मुंबई बंदरचे चेअरमन संजय भाटिया यांच्या हस्ते झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -