डी. जे ब्राव्हो, हरभजनचे अफलातून सेलिब्रेशन

फोटो सौजन्य - द स्पोर्ट मिरर. कॉम

डी. जे. ब्राव्हो ! आयपीएलमध्ये चेन्नई सुपरकिग्सकडून खेळणारा वेस्ट इंडिजचा खेळाडू! ब्राव्होने मैदान दणाणून सोडल्यानंतर त्याने डान्स फ्लोरवर देखील आपला जलवा दाखवला. मुंबईतल्या वानखेडे मैदानावर सनरायजर्स हैदराबादवर रोमहर्षक विजय मिळवल्यानंतर चेन्नई सुपरकिंग्स खेळाडूंच्या आनंदाला पारावर उरला नाही.हेच निमित्त करत डी. जे. ब्राव्हो आणि हरभजनसिंगने ड्रेसिंग रूममध्ये डान्स केला. दोघांचा डान्स पाहून धोनीला देखील हसू आले.

 

ब्राव्हो आणि हरभजनसिंगच्या डान्सचा व्हिडीओ चेन्नई सुपरकिंग्सच्या इंन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. खेळाडूंच्या ड्रेसिंग रूममधल्या धमाल-मस्तीचा हा काही पहिला व्हिडीओ नाही आहे. यापूर्वी देखील अनेक खेळाडूंचे अशा प्रकारचे व्हिडीओ सोशल मीडियावर आपण पाहिले आहेत. त्यात आता भर पडली आहे ती डी. जे. ब्राव्हो आणि हरभजनसिंगच्या डान्सची!