घरक्रीडासिमेंट रस्त्याच्या कामांसोबतच गटाराची कामेही नित्कृष्ट दर्जाची

सिमेंट रस्त्याच्या कामांसोबतच गटाराची कामेही नित्कृष्ट दर्जाची

Subscribe

यावरून जबाबदार अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची शासनाकडे मागणी आहे.

भाईंदर :- मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मीरा- भाईंदर शहरात ४७ ठिकाणी नवीन सिमेंट रस्ते आणि गटारे बनविण्याचे काम सुरू आहेत. त्यात ठेकेदार आणि अधिकार्‍यांच्या संगनमताने सावळा गोंधळ सुरू आहे. कामावर कुठलाच अधिकारी उपस्थित नसल्याने किंवा एकाच अधिकार्‍यांकडे अधिकची कामे झाल्याने लक्ष देता येत नसल्याने कामे रामभरोसेच सुरू आहेत. त्यामुळे कामाची गुणवत्ता आणि दर्जा घसरला आहे. तसेच भविष्यात त्या सिमेंट रस्त्यावर सुद्धा खड्डे पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर ठेकेदारांनी शहरात अक्षरशः जुनी व अस्तित्वात असलेली गटारे तोडून नव्याने बांधायचे असतानाही ठेकेदार फक्त वरवर स्लॅब तोडून किंवा त्याच स्लॅबवर थातूरमातूर स्लॅब टाकण्याचे काम सुरू आहे. यावरून जबाबदार अधिकार्‍यांची जबाबदारी निश्चित करून त्यांना निलंबित करण्याची सामाजिक कार्यकर्त्यांची शासनाकडे मागणी आहे.

नवीन सिमेंट रस्ते बनविताना जुनी अस्तित्वात असलेली गटारे तोडून नव्याने गटार बांधणे असतानाही त्याच गटारांवर ठेकेदार व एमएमआरडीए अधिकार्‍यांच्या मिलीभगतने फक्त वर वर स्लॅब टाकत आहेत. तर बहुतांश ठिकाणी जुन्या स्लॅबवरच नवीन स्लॅबचा थर चढविण्याचे काम सुरू आहे. त्यातच जुनी गटारी तुंबलेली असताना त्याची साफसफाई न-करताच पुन्हा त्या तुंबलेल्या गटारावरच बांधकाम सुरू केलेले आहेत,अशी सामाजिक कार्यकर्त्यांची तक्रार आहे. त्यात गटार बनविताना तळात सोलिंग करताना ( ९ ते १० इंच दगड थर ), आणि त्यावर पीसीसी (सिमेंट काँक्रीटचा ६ इंच थर ) आणि मग त्यावर लोखंडी स्टील बांधून त्यावर राफ्ट २०० एम.एम. जाडीचा थिकनेस थर अंथरला जातो. त्यानंतर सिमेंट काँक्रीटची परदी (भिंत ) डिझाईनप्रमाणे २०० एम.एम. ते २५० एम.एम. जाडीचा आणि स्लॅब ६ ते ८ इंच ( मालाचा रेशो एम – २० ते एम – ३० ) वापरला जातो. मात्र त्यात कुठेही मालाची आणि कामाची गुणवत्ता राखली जात नाही आहे. तसेच अस्तित्वात असलेली चार फूट उंचीची आणि तीन फूट रुंदीची काही ठिकाणी चार फूट खोल व चार फूट रुंद असे गटारे नव्याने बनवायचे असतानाही त्याठिकाणी फक्त वर स्लॅब टाकून कामे सुरू असल्याचे दिसून येत आहे. शहरात सध्या सिमेंट रस्ता बनविणारे एन.ए. कंन्स्ट्रक्शन कंपनी, मा. मुंबादेवी कंन्स्ट्रक्शन कंपनी, एम.ई. इन्फ्रा कंपनी, मे. बीटकॉन, आर.ई. इन्फ्रा, आर अँड बी इन्फ्रा कंपनीचे ठेकेदार सिमेंट रस्ता बनविताना वरवर खोदकाम करून सोलिंग न-करता रात्रीला कामे करून रस्ते बनविण्याचे कामे सुरू आहे.

- Advertisement -

 

अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी

- Advertisement -

याप्रकरणी एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता अजय तितरे आणि उपअभियंता टेंभुर्णीकर यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी मीरा- भाईंदर शहरातील सामाजिक संस्था आणि जागरूक नागरिकांनी केली आहे. तर अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने नियमाला तिलांजली देऊन शहरात सर्वच कामे सब ठेकेदारांच्या मार्फत सुरू आहेत. याप्रकरणी सर्वच राजकीय पक्षांनी चिडीचूप घेतली आहे,अशीही चर्चा आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -