घरक्रीडाAmateur Olympia : आशियातील सर्वात मोठे बॉडीबिल्डिंग फेस्टिवल पडले पार

Amateur Olympia : आशियातील सर्वात मोठे बॉडीबिल्डिंग फेस्टिवल पडले पार

Subscribe

मुंबई : आशियातील सर्वात मोठा फिटनेस फेस्टिवल – इंटरनॅशनल हेल्थ, स्पोर्ट्स अँड फिटनेस फेस्टिवल 2023 मध्ये मुंबईत 17 ते 19 नोव्हेंबर दरम्यान भारतातील फिटनेस उद्योगक्षेत्रातील दिग्गज एकत्र आले होते. भारतातील आघाडीचा स्पोर्ट्स आणि वेलनेस न्यूट्रिशन ब्रँड स्टेडफास्ट न्यूट्रिशनने प्रायोजित केलेले प्रतिष्ठित स्टेडफास्ट न्यूट्रिशन भारत प्रो शो आणि अमॅच्युअर ऑलिम्पिया या फेस्टिवलचे प्रमुख आकर्षण ठरले. (Amateur Olympia Asias biggest bodybuilding festival is held)

हेही वाचा – “…तर सामन्यात मोठा फरक”, सुनील गावसकरांनी दाखवून दिली रोहित शर्माची मोठी चूक

- Advertisement -

भारतामध्ये खेळांशी संबंधित वर्षभरातील प्रमुख कार्यक्रमांमध्ये स्टेडफास्ट न्यूट्रिशन प्रो शोचा समावेश आहे. या शोच्या विजेत्यांना जगातील सर्वोच्च बॉडीबिल्डिंग टूर्नामेंट मि. ऑलिम्पियामध्ये थेट प्रवेश मिळतो (अरनॉल्ड स्चवार्झेनेगजर, फिल हेल्थ आणि डेक्स्टर जॅक्सन हे याचे माजी विजेते आहेत). भारत आणि परदेशातील ऍथलिट्स व बॉडीबिल्डर्स या चॅम्पियनशिपसाठी उत्सुक असतात. महत्त्वाकांक्षी बॉडीबिल्डर्ससाठी अमॅच्युअर ऑलिम्पिया ही देशातील सर्वात मोठी चॅम्पियनशिप आहे, या टुर्नामेंट्समध्ये सुमारे 600 ऍथलिट्स सहभागी झाले होते. 2022 मध्ये स्टेडफास्ट न्यूट्रिशन हा पहिला असा ब्रँड ठरला ज्यांनी भारतात प्रो शो प्रायोजित केला. देशात बॉडीबिल्डिंग खेळासाठी हा खूप महत्त्वाचा टप्पा होता.

चॅम्पियनशिपबद्दल स्टेडफास्ट न्यूट्रिशनचे संस्थापक अमन पुरी यांनी सांगितले, “प्रो शोला सलग तिसऱ्यांदा आणि अमॅच्युअर ऑलिम्पियाला चौथ्या वर्षी प्रायोजित करताना स्टेडफास्ट न्यूट्रिशन बॉडीबिल्डिंग खेळाला प्रोत्साहन देण्याच्या व याला मुख्य प्रवाहातील एक खेळ बनवण्याच्या प्रयत्नात आणखी एक पुढचे पाऊल उचलत आहे. 2050 शाळांपर्यंत भारताला जगाची खेळांची राजधानी बनवण्याच्या आमच्या उद्दिष्टाला अनुसरून आम्ही हे करत आहोत. उदयोन्मुख प्रतिभांना जागतिक स्थान व संधी मिळवून देण्यात, जगातील सर्वात प्रतिष्ठित बॉडीबिल्डिंग टूर्नामेंटमध्ये भाग घेण्याची संधी देण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. भारतात बॉडीबिल्डिंग खेळाची लोकप्रियता वाढत आहे, पण अद्यापही त्याला पुरेसे फंडिंग व लक्ष मिळत नाही, या खेळात युवकांना सक्षम बनवण्याची प्रचंड क्षमता भारतामध्ये असल्याचे आम्ही दाखवून दिले आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – ऑस्ट्रेलियातील प्रसार माध्यमांची भारतावर टीका; वाचा, काय आहे कारण?

ते पुढे म्हणाले, “भारतातील अनेक ऍथलिट्स अतिशय प्रतिभावान आहेत, पण त्यांना उत्कर्ष साधण्यासाठी योग्य इकोसिस्टिमची आवश्यकता आहे, या चॅम्पियनशिप्समध्ये आम्ही ती इकोसिस्टिम पुरवत आहोत.” अमन पुरी यांच्या नेतृत्वाखाली स्टेडफास्ट न्यूट्रिशनने प्रो शो आणि अमॅच्युअर ऑलिम्पियाव्यतिरिक्त अनेक बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप्स प्रायोजित केल्या आहेत, त्यामध्ये शेरू क्लासिक प्रो क्वालिफायर्स आणि नॅशनल फिजिक कमिटीच्या बॉडीबिल्डिंग स्पर्धांचा देखील समावेश आहे. अमॅच्युअर ऑलिम्पियाच्या विजेत्यांना प्रोफेशनल सर्किटमध्ये भाग घेण्याची संधी मिळते, त्यामुळे त्यांना भरपूर पैसे, स्पॉन्सरशिप्स मिळवता येतात तसेच भारत व परदेशात प्रोफेशनल संधी देखील मिळतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -