घरIPL 2020IPL 2020 : अंबाती रायडूची उणीव भासली; दिल्लीविरुद्ध पराभवानंतर धोनीचे विधान

IPL 2020 : अंबाती रायडूची उणीव भासली; दिल्लीविरुद्ध पराभवानंतर धोनीचे विधान

Subscribe

रायडू सलग दोन सामन्यांना मुकला.  

दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्सला सलग दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला. चेन्नईने यंदाच्या आयपीएल मोसमाची विजयी सुरुवात केली होती. त्यांनी सलामीच्या लढतीत गतविजेत्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला होता, ज्यात अंबाती रायडूने ७१ धावांची मॅचविनिंग खेळी केली होती. मात्र, रायडू यानंतरच्या दोन सामन्यांना मुकला आणि हे दोन्ही सामने चेन्नईने गमावले. आधी राजस्थान रॉयल्स आणि नंतर दिल्ली कॅपिटल्सने त्यांना पराभूत केले. दिल्लीविरुद्धच्या सामन्यात आम्हाला रायडूची उणीव भासल्याचे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने कबूल केले.

खेळपट्टी थोडी संथ झाली

या सामन्यात आम्ही निराशाजनक खेळ केला नाही. मैदानावर दव पडले नाही, पण दुसऱ्या डावात खेळपट्टी थोडी संथ झाली. फलंदाजीत आम्हाला चांगली सुरुवात मिळत नाहीये आणि याची आम्हाला चिंता आहे. या सामन्यातही सुरुवातीच्या षटकांत आम्हाला वेगाने धावा करण्यात अपयश आले. त्यामुळे रन रेट वाढत गेला आणि आमच्या मधल्या फळीतील फलंदाजांवर अधिक दबाव आला. त्यामुळे आम्हाला यावर तोडगा काढावा लागेल. आम्हाला कदाचित संघात बदल करण्याबाबत विचार करावा लागेल. रायडूची आम्हाला उणीव भासत आहे. त्याचे पुनरागमन झाल्यावर संघ संतुलित होईल. आम्ही एक अतिरिक्त गोलंदाज खेळवू शकू, असे दिल्लीविरुद्धच्या सामन्यानंतर धोनीने नमूद केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -