घरक्रीडाएकदिवसीय मालिका विजय गरजेचा, नाहीतर भारताचे नंबर 1 स्थान धोक्यात

एकदिवसीय मालिका विजय गरजेचा, नाहीतर भारताचे नंबर 1 स्थान धोक्यात

Subscribe

नवी दिल्ली : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एकदिवसीय मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना उद्या (२२ मार्च) होणार आहे. बॉर्डर गावसकर ट्रॉफी जिंकल्यानंतर एकदिवसीय मालिका जिंकण्याची भारताला संधी आहे. जर असे झाले तर आयसीसी रँकींगमध्ये भारत आपले नंबर 1 चे स्थान कायम राखू शकतो.

भारतीय संघाने पहिल्या एकदिवसीय सामन्यात विजय मिळवल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन केले. त्यामुळे तीन सामन्याची एकदिवसीय मालिका 1-1 अशी बरोबरीत असून आता एकदिवसीय मालिका कोण जिंकणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. चेन्नईत उद्या तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी (22 मार्च) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये पार पडणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी दोन्ही संघात अटीतटीची लढत होईल, हे नक्की. चेन्नईमध्ये होणाऱ्या सामन्यात एकदिवसीय मालिकेतील विजयासोबत भारताला आयसीसीचा नंबर 1 चे स्थान कायम राखण्याची संधी आहे.

- Advertisement -

सध्या भारतीय संघ एकदिवसीयमध्ये 114 गुणांसह पहिल्या क्रमांकाचा संघ आहे, मात्र जर भारतीय संघ चेन्नईमध्ये पराभूत झाला तर भारत दुसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो. कारण ऑस्ट्रेलिया संघ 112 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलिया संघाने तिसरा सामना जिंकला तर दोन्ही संघाचे 113 गुण होतील, पण ऑस्ट्रेलिया संघ एव्हरेजने गुणांसह भारतीय संघाच्या पुढे असतील. अशा परिस्थितीत भारत आपले नंबर 1 चे स्थान गमावू शकतो. त्यामुळे दोन्ही संघांसाठी चेन्नईमध्ये विजय मिळवणे आवश्यक आहे.

भारतीय संघ चेन्नईमध्ये सामना जिंकला तर त्यांचे 115 गुण होतील. यासह भारत पहिल्या क्रमांकावर येईल आणि ऑस्ट्रेलिया संघ 2 स्थानांनी खाली जाऊन चौथ्या स्थानावर घसरेल. कारण न्यूझीलंड आणि इंग्लंड संघ 111 गुणांसह अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत.

- Advertisement -

दोन्ही संघात अटीतटीच्या सामन्याची शक्यता
दोन्ही संघांनी एकदिवसीय मालिकेत 1-1 ने बरोबरी घेतल्यामुळे चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियममध्ये तिसरा सामना अटीतटीचा होण्याची शक्यता आहे. विशाखापट्टणममध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये कशापद्धतीने पुनरागमन करतो आणि ऑस्ट्रेलिया संघ आपला विजयी फॉर्म कायम राखतो का हे पाहणे औत्सुत्याचे ठरणार आहे.
चेन्नईच्या खेळपट्टीवर स्पिनर्सचे वर्चस्व असल्यामुळे भारतीय संघाला अधिक मदत मिळू शकते. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल खेळपट्टी होती. ज्याचा फायदा ऑस्ट्रेलिया आणि भारत या दोन्ही संघांनी घेतला. मात्र भारतीय फलंदाज जास्त संघर्ष करावा लागला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -