फोटोमुळे झाला हार्दिक पांड्या सोशल मीडियावर ट्रोल

भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या इंग्लंड दौऱ्यात काही खास कामगिरी करू शकला नाहीये त्यात त्याने सोशल मीडियावर एक फोटो टाकल्याने तो चांगलाच व्हायरल झाला आहे.

hardik p
हार्दिक पांड्या

भारतीय क्रिकेट संघाला इंग्लंडच्या दौऱ्यावर काही खास कामगिरी करता आलेली नाही. टी-२० मालिका सोडली तर कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताला दणदणीत पराभव स्वीकारावा लागला. तेव्हापासून भारतीय चाहते सोशल मीडियावर भारतीय क्रिकेटर्सना ट्रोल करत आहेत. त्यात अष्टपैलू खेळाडू हार्दिक सामन्यांत काहीच करू शकला नाही. त्यानंतर त्याने आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवर पराभवाचा खेद व्यक्त करणारी पोस्ट टाकली मात्र सोबतच त्याने स्वत:चा एक चांगला फोटो देखील टाकला. त्यामुळे नेटीझन्सनी त्याला चांगलेच ट्रोल करत अगदी क्रिकेट सोडून मॉडेलिंग कर असे परखड बोल देखील सुनावले आहेत.

ही आहे पोस्ट

हार्दिकने इंग्लंड दौऱ्यावरून परत येताना एक पोस्ट टाकली आहे. ज्यात त्याने लिहीले आहेकी, “परत भारतात परत आलोय. मात्र रिझल्ट्सने आम्ही खुश नाही आहोत. पण तरी आम्ही चांगला लढा दिला आणि घरी येऊन बरं वाटतय काही दिवसांतच आशिया कपला जायचे असल्याने काही दिवसच घरी राहता येणार आहे.”


वरील फोटोच्या कमेंट्समध्ये भारतीय क्रिकेट चाहत्यांनी आपला राग व्यक्त केला असून एका चाहत्याने कमेंटमध्ये हार्दिकचा फोटो एडिट करत त्याला विदूषक म्हटले आहे.

हार्दिकला फक्त सोशल मीडियावर राहा क्रिकेट खेळू नको अशीही कमेंट करण्यात आली आहे.

तसेच मॉडेलिंग न करता क्रिकेटवर लक्ष देण्याचा सल्लाही हार्दिकला दिला आहे.