विराट कोहलीच्या अडचणी वाढणार, अनिल कुंबळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची शक्यता?

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनंतर आता अनिल कुंबळेंना नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची दाट शक्यता आहे.

Anil Kumble likely to become Team India's head coach
विराट कोहलीच्या अडचणी वाढणार, अनिल कुंबळे टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक बनण्याची शक्यता?

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ टी२० वर्ल्ड कपनंतर समाप्त होत आहे. अशामध्ये सौरव गांगुली यांच्या नेतृत्वात बीसीसीआय नव्या मुख्य प्रशिक्षकांसाठी टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू अनिल कुंबले आणि विविएस लक्ष्मण यांच्यातील एकाला मुख्य प्रशिक्षक करण्याची शक्यता आहे. कर्णधार विराट कोहलीसोबत असलेल्या मतभेदांमुळे ४ वर्षांपुर्वी अनिल कुंबळेंनी आपलं पदाचा राजीनामा दिला होता. आता पुन्हा अनिल कुंबळे यांना मुख्य प्रशिक्षक केल्यावर विराटच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. अनिल कुंबळे हे यापुर्वी २०१६ ते १७ या कालावधीत भारतीय संघाचे प्रशिक्षक होते. आता पुन्हा एकचा मुख्य प्रशिक्षकाच्या शर्यतीमध्ये अनिल कुंबळे यांचे नाव प्रथमस्थानी आहे.

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रींनंतर आता अनिल कुंबळेंना नवे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्याची दाट शक्यता आहे. यापुर्वी अनिल कुंबळेंना मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या जागी नियुक्त करण्याचा निर्णय सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली यांच्या नेतृत्वात असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने घेतला होता. परंतु चॅम्पियन ट्रॉफीमध्ये अंतिम सामन्यात पाकिस्तानसोबत झालेल्या पराभवामुळे विराट कोहली आणि अनिल कुंबळेंमधील मतभेद चव्हाट्यावर आले होते. यानंतर अनिल कुंबळेंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

बीसीसीआय अनिल कुंबळेंच्या ऐवजी लक्ष्मणलाही मुख्य प्रशिक्षक करु शकतात. लक्ष्मण आयपीएलमधील संघ सनराईजर्स हैदराबादचे प्रशिक्षक म्हणून काम करत आहेत. परंतु कुंबळे मुख्य प्रशिक्षक पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. बीसीसीआयमधून अशी माहिती मिळाली आहे की, अनिल कुंबळे यांनी प्रशिक्षक पदाचा राजीनामा ज्या कारणांमुळे दिला आहे. त्यामध्ये सुधारणा करणे गरेजेचे आहे. ज्यामध्ये सीओए समिती विराट कोहलीच्या दबावामध्ये येऊन अनिल कुंबळेंना हटवले होते ते योग्य नसल्याचे बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे. यामध्ये हे महत्त्वाचे आहे की, यामध्ये हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे की, अनिल कुंबळे आणि लक्ष्मण मुख्य प्रशिक्षक पदासाठी इच्छुक आहेत की नाही? यामुळे मुख्य प्रशिक्षकाचे नाव अद्याप गुलदस्त्यात असलं तरी अनिल कुंबळेंच्या नावाची मात्र जोरादार चर्चा सुरु आहे.


हेही वाचा : T20 वर्ल्ड कपनंतर कोहली कर्णधारपद सोडणार असल्याची अपेक्षा होती – वेंगसरकर