घरक्रीडाअंकुर स्पोर्ट्स क्लबचा उपांत्य फेरीत प्रवेश

अंकुर स्पोर्ट्स क्लबचा उपांत्य फेरीत प्रवेश

Subscribe

चिंतामणी चषक कबड्डी स्पर्धा

अंकुर स्पोर्ट्स क्लब, विजय क्लब, जय भारत क्रीडा मंडळ या मुंबई शहरच्या संघांसोबत मुंबई उपनगरच्या जॉली स्पोर्ट्स क्लबने चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ आयोजित चिंतामणी चषक पुरुष राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. या फेरीत विजय क्लब विरुद्ध जय भारत आणि अंकुर स्पोर्ट्स विरुद्ध जॉली स्पोर्ट्स अशा लढती होतील.

लालबाग येथे सुरु असलेल्या या स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अंकुर स्पोर्ट्सने विजय बजरंग व्यायाम शाळेला २८-१८ असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. पूर्वार्धात दोन्ही संघांनी उत्तम खेळ केला. त्यामुळे मध्यंतराला अंकुरकडे १४-१२ अशी केवळ दोन गुणांची आघाडी होती. मात्र, उत्तरार्धात त्यांनी अधिक आक्रमक खेळ करत हा सामना २८-१८ असा दहा गुणांच्या फरकाने जिंकला. सुशांत साईलच्या चढाया आणि त्याला सुभाष साईल, किसन बोटे यांच्या भक्कम पकडीची साथ यामुळे अंकुरने हा विजय साकारला.

- Advertisement -

जय भारत मंडळाने केदारनाथ क्रीडा मंडळाचा प्रतिकार ३५-२० असा मोडून काढत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मध्यंतराला जय भारतकडे २०-११ अशी आघाडी होती. त्यांच्या विजयात सागर कावीलकर, अभिजित घोडे, बाजीराव होडगे हे खेळाडू चमकले. विजय क्लबने गोल्फादेवी सेवा मंडळाला ५४-१४ असे सहज पराभूत केले. अजिंक्य कापरे, अक्षय सोनी या विजयाचे शिल्पकार ठरले. उपांत्यपूर्व फेरीतील अखेरच्या सामन्यात जॉली स्पोर्ट्सने विशाल राऊत, अभिषेक नर यांच्या दमदार खेळाच्या जोरावर बंड्या मारुतीचा ३४-१७ असा पराभव केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -