घरक्रीडाडोनाल्डचा माफीनामा, तर द्रविडचा मिश्किल अंदाज

डोनाल्डचा माफीनामा, तर द्रविडचा मिश्किल अंदाज

Subscribe

तब्बल २५ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका व भारत सामन्यात हा वाद झाला होता. तसं याला वाद म्हणता येणार नाही. फलंदाजी करत असताना राहुल द्रविडला अॅलन डोनाल्डने स्लेजिंग केले होते. या कृत्याचा डोनाल्डला पश्चाताप झाला होता. मनातील खंत त्याने अखेर बोलून दाखवली. ती घटना म्हणजे मुर्खपणाच होती, असे डोनाल्ड म्हणाला.

नवी दिल्लीः  क्रिकेट सामान्यात खेळाडूंमध्ये अधूनमधून वाद होत असतात. खेळाडू वृत्तीने वाद मिटतातही. असाच एक वाद २५ वर्षांनी समाेर आला आहे व तो दोन्ही खेळाडूंनी आपआपल्या अंदाजात व्यक्त केला. विशेष म्हणजे क्रिकेटच्या मैदानात हा वाद झाला होता.

तब्बल २५ वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका व भारत सामन्यात हा वाद झाला होता. तसं याला वाद म्हणता येणार नाही. फलंदाजी करत असताना राहुल द्रविडला अॅलन डोनाल्डने स्लेजिंग केले होते. या कृत्याचा डोनाल्डला पश्चाताप झाला होता. मनातील खंत त्याने अखेर बोलून दाखवली. ती घटना म्हणजे मुर्खपणाच होती, असे डोनाल्ड म्हणाला.

- Advertisement -

डरबन येथे १९९७ साली हा सामना झाला होता. त्यादिवशी द्रविडची तुफान फलंदाजी सुरु होती. तो बाद होत नव्हता. माझा सयंम तुटला आणि मी चुकीचे कृत्य केले. मी राहुलचा आदर करतो. मला त्याला भेटायचे आहे. त्या घटनेबद्दल बोलायचे आहे. त्याची माफी मागायची आहे, असे डोनाल्डने एका मुलाखतीत सांगितले.

राहुल तुझी मी माफी मागतो. तू जर ऐकत असशील तर मला तुझ्यासोबत थोडा वेळ घालवायचा आहे, असेही डोनाल्ड म्हणाला होता. एका कार्यक्रमात राहुल द्रविडला डोनाल्डचा हा व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यावर राहुल हसत म्हणाला, मी भेटायला तयार आहे. पण पैसे तो देत असेल तर.

- Advertisement -

डोनाल्ड हा दक्षिण आफ्रिका संघाचा वेगवान गोलांदाज होता. त्याने अनेक सामन्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे त्याच्या माफीनाम्याने सर्वांनाच आश्चर्यचकीत केले आहे. डोनाल्ड सध्या बांगलादेश संघाचा गोलंदाजीचा प्रशिक्षक आहे.

सामन्यात खेळाडूंमध्ये खटके उडाल्याच्या अनेक घटना आहेत. भारत-पाकिस्तान सामन्यात तर अनेकवेळा खेळाडूंमध्ये वाद झाला आहे. एका सामन्यात पाकिस्तानचा माजी फलंदाज जावेद मियादादने भारताचा यष्टीरक्षक किरण मोरेला भर सामन्यात उड्या मारुन दाखवल्या होत्या. त्यावेळी त्याच्यावर टीकाही झाली होती. तसेच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वक्खार युनुससोबतही भारतीय खेळाडूंचे खटके उडायचे.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -