घरक्रीडाIPL 2022: आयपीएलच्या १० संघातील कर्णधारांची घोषणा, दोन परदेशी खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची...

IPL 2022: आयपीएलच्या १० संघातील कर्णधारांची घोषणा, दोन परदेशी खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची कमान

Subscribe

आयपीएल २०२२ च्या स्पर्धेला सुरूवात होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक आहेत. २६ मार्चला आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. यावेळी आयपीएलमध्ये दहा संघ सहभागी होणार आहेत. तसेच प्रत्येक संघाच्या कर्णधाराचे नाव आता समोर आले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आज त्यांच्या कर्णधाराची घोषणा केली आणि दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिसला आरबीसीच्या कर्णधारपदी बसवण्यात आलं. म्हणजेच विराट कोहलीची जागा आता फाफ डू प्लेसिस घेणार आहे. यावेळी चार संघांची कमान यष्टिरक्षकांच्या हाती आहे. तर दोन संघांचे कर्णधार परदेशी आहेत. इतर आठ संघांचे कर्णधार भारतीय आहेत.

- Advertisement -

आयपीएलच्या दहा संघांचा कर्णधार कोण ?

1. मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा
2. चेन्नई सुपर किंग्स – महेंद्रसिंग धोनी
3. कोलकाता नाइट रायडर्स- श्रेयस अय्यर
4. सनरायझर्स हैदराबाद – केन विल्यमसन (न्यूझीलंड)
5. दिल्ली कॅपिटल्स- ऋषभ पंत
6. राजस्थान रॉयल्स- संजू सॅमसन
7. गुजरात टायटन्स- हार्दिक पंड्या
8. लखनऊ सुपर जायंट्स – केएल राहुल
9. पंजाब किंग्स – मयंक अग्रवाल
10. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर – फाफ डू प्लेसिस (दक्षिण आफ्रिका)

आयपीएल लीगचे सर्व ७० सामने मुंबई आणि पुण्यात खेळवले जाणार आहेत. एकूण ५५ सामने मुंबईत, तर १५ सामने पुण्यात होणार आहेत. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर २० सामने, सीसीआयचे १५, डीवाय पाटील स्टेडियममध्ये २० सामने होणार आहे. तर पुण्यात एमसीए स्टेडियमवर १५ सामने खेळवले जाणार आहेत. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने गेल्या वर्षी २०२१ चे विजेतेपद पटकावले होते. मात्र, यावेळी कोणता संघ विजेतेपद पटकावणार हे पाहणं चाहत्यांसाठी महत्त्वाचं ठरणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा : IPL 2022 RCB New Captain: आरसीबीकडून नव्या कर्णधाराची घोषणा, विराट कोहलीच्या जागी ‘हा’ खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -