घरक्रीडादुसरा दिवस न्यूझीलंडचा

दुसरा दिवस न्यूझीलंडचा

Subscribe

इशांतचे 3 बळी

कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने वेलिंग्टन कसोटी सामन्यात आघाडी घेतली आहे. भारतीय संघाला पहिल्या डावात १६५ धावांवर गारद केल्यानंतर न्यूझीलंडच्या फलंदाजांनी सामन्यावर आपली पकड घट्ट बसवली. कर्णधार विल्यमसन आणि रॉस टेलर यांनी तिसर्‍या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी रचत संघाला आघाडी मिळवून दिली.

कर्णधार केन विल्यमसन आणि रॉस टेलरने फटकेबाजी करत न्यूझीलंडला आघाडी मिळवून देण्यात मदत केली. तिसर्‍या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी करणार्‍या रॉस टेलरचे अर्धशतक ६ धावांनी तर कर्णधार केन विल्यमसनचे शतक ११ धावांनी हुकले. विल्यमसनने ८९ धावा केल्या.

- Advertisement -

आपला १०० वा कसोटी सामना खेळणार्‍या रॉस टेलरने विल्यमसनला चांगली साथ दिली. दोघेजण मैदानावर स्थिरावलेले असतानाच, इशांत शर्माने पुन्हा एकदा भारताला यश मिळवून दिले. ४४ धावांवर खेळत असताना इशांतने टाकलेल्या बाऊन्सर चेंडूचा अंदाज न आल्याने टेलर पुजाराच्या हाती झेल देऊन माघारी परतला. याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये रॉस टेलरला सर्वाधिकवेळा बाद करणार्‍या भारतीय गोलंदाजांच्या यादीत इशांतला आता तिसरे स्थान मिळाले आहे.

इशांत शर्मानेच भारताला पहिले यश मिळवून दिले. सलामीवीर टॉम लॅथमला यष्टीरक्षक पंतकडे झेल देण्यास भाग पाडत इशांतने न्यूझीलंडला पहिला धक्का दिला. यानंतर विल्यमसन आणि ब्लंडल यांची भागीदारीही इशांतने ब्लंडलचा त्रिफळा उडवत मोडली.भारताकडून इशांत शर्माने दुसर्‍या दिवसाच्या अखेरीस ३ तर मोहम्मद शमी आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी १-१ बळी घेतला.

- Advertisement -

कर्णधार कोहलीचा पराक्रम

रविचंद्रन अश्विनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने स्लिपमध्ये हेन्री निकोल्सचा झेल पकडला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोहलीचा हा २५० वा झेल ठरला. यासह विराट कोहलीने अझरुद्दीन-द्रविड आणि सचिन यांच्या पंगतीत स्थान मिळवले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -