लॉकडाऊनमध्ये नेटिझन्सच्या क्रिएटिव्हिटीला ऊत, म्हणे विरूष्का प्रेग्नंट

विरुष्काने चाहत्यांना दिली गुडन्यूज!

anushka sharma pregnant pictures virat kohli goes viral know fact
विरुष्काने चाहत्यांना दिली गुडन्यूज!

भारतीय क्रिकेटर हार्दिक पंड्या आणि अभिनेत्री नताशा स्टँकोविच यांनी त्यांच्या चाहत्यांना काही दिवसांपूर्वी गुडन्यूज दिली होती. नताशा गर्भवती असून ही बातमी स्वतः हार्दिकने सोशल मीडियावर शेअर केली होती. हार्दिकने गर्लफ्रेंड नताशाचे बेबी बंपसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत त्यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. त्यानंतर आता भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्काने देखील त्यांच्या चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. सध्या विरुष्काचा एक खास फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा गर्भवती असल्याचे दिसून आले आहे.

हे सत्य आहे का?

सध्या सोशल मीडियावर विरुष्काचा एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोमध्ये विराटने अनुष्काच्या पोटावर हात ठेवल्याचे दिसून येत आहे. पण, तसं काही नाही. कारण व्हायरल होत असलेला फोटो एडिट करण्यात आल्याचे दिसत आहे. या फोटोची सत्यता तपासल्यानंतर हा जेनेलिया डिसूजा आणि रितेश देशमुख यांचा फोटो असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या चेहऱ्याच्या जागी अनुष्का आणि विराटचा फोटो एडिट करण्यात आला आहे.

सध्या लॉकडाऊन असल्यामुळे बरेच उद्योग, व्यवसाय आणि शाळा, कॉलेज बंद असल्यामुळे सर्वांना घरात बसावे लागले आहे. त्यामुळे या लॉकडाऊनच्या काळात नेटिझन्सची चांगलीच क्रिएटिव्हिटी दिसून येत असून विरुष्काचा देखील फोटो नेटिझन्सने क्रिएट करत विरुष्का प्रेग्नंट असल्याचे बोले जात आहे.


हेही वाचा – ‘हा’ क्रिकेटपटू म्हणतो विराट कोहली झाला म्हातारा