घरक्रीडाTeaControvercy: 'अनुष्काला चहा देत होते..' फारुख इंजीनियरच्या वक्तव्यावर MSK प्रसादने केला खुलासा

TeaControvercy: ‘अनुष्काला चहा देत होते..’ फारुख इंजीनियरच्या वक्तव्यावर MSK प्रसादने केला खुलासा

Subscribe

सध्या टिम इंडिया पहिल्या टेस्ट चॅम्पियनशिप फाइनल मध्ये न्युझिलंडशी सामना करण्यास युनायटेड किंडममध्ये दाखल झाली आहे

भारतीय टिमचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा यांची जोडी एक पॉवर कपल म्हणून ओळखली जाते. सोशल मीडीयावर तर त्यांचे अनेक फॅन पेजेस चाहत्यांनी तयार केले आहेत. सध्या टिम इंडिया पहिल्या टेस्ट चॅम्पियनशिप फाइनल मध्ये न्युझिलंडशी सामना करण्यास युनायटेड किंडममध्ये दाखल झाली आहे. शुक्रवारी 18 जूनला हा सामना साउथेम्प्टनमध्ये सुरु होणार आहे. अनुष्का आणि विराट आणि त्यांचे लहान बाळ सध्या तिघेही युके मध्ये आहेत. आणि याचदरम्यान भारतीय टीमचे पुर्व सिलेक्टर एमएसके प्रसाद यांनी जकळ-जवळ दोन वर्षानंतर विराट-अनुष्कावर चहा देणाऱ्या कंमेंटबाबत खुलासा केला आहे. 2019 वल्ड कप दरम्यान टिम इंडियाचे पुर्व क्रिकेटर फारूख इंजीनियर याने अनेक प्रश्न ऊपस्थित करत एमएसके प्रसादच्या सिलेक्शन कमिटीला मिकी माऊस सिलेक्शन कमिटी म्हंटले होते तसेच इंजीनयिर यांनी सिलेक्टर्सच्या क्षमतेवर संशय घेत 2019 च्या वर्ल्ड कप दरम्यान सिलेक्टर अनुष्का शर्माला चहा देण्यात व्यस्त होते असे म्हणाले होते . या वक्तव्यानंतर अनुष्काने सोशल मीडियावर क्रिकेटर फारूख इंजीनियर यांच्यावर कडक शब्दत टिका केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

- Advertisement -

अशातच एमएसके प्रसादने या मुद्यावरआपले मत मांडत म्हणाले आहे की, “भारतीय क्रिकेट टीमच्या सिलेक्टरचं काम खुप कठीण असते. तुम्हाल क्वचितच तुमच्या कामाचे कौतुक केले जाते. तुम्ही निवडलेल्या खेडाळूंच्या वाईट प्रदर्शनावर देखिल तुमच्यावर टिका करण्यात येते. अनुष्का शर्मा प्रकरणाबाबत निवड समितीला विनाकारण वादात ओढले गेले. पण जेव्हा संघाने स्टार खेळाडूंशिवाय ऑस्ट्रेलियामध्ये मालिका जिंकली तेव्हा निवड समितीला कुणीही श्रेय दिले नाही.संघ व्यवस्थापनाकडून मिळालेल्या कौतुकामुळे समाधान मिळते. बाहेरील लोकं आम्हाला ओळखतील किंवा नाही, परंतु आम्ही काय केले ते आतल्या लोकांना माहित आहे.”


हे हि वाचा – UEFA EURO : पॅट्रिक शिकचा अविश्वसनीय गोल; चेक प्रजासत्ताकची विजयी सुरुवात

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -