Virat Kohli 100th Test : विराटच्या १००व्या टेस्टसाठी अनुष्का पोहोचली मैदानात, नेटिझन्स केलं ट्रोल

विराटच्या या खास दिवशी त्यांची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील तिथे विराटसोबत क्रिकेटच्या मैदानावर उपस्थित होती. विराटने सन्मान झाल्यानंतर अनुष्काला प्रेमाची मिठी देखील मारली. अनुष्काने सर्वांसमोर विराटचे कौतुक आणि अभिनंदन केले.

anushka sharma trolled for joining virat kohli cricketers 100th test felicitation
Virat Kohli 100th Test : विराटच्या १००व्या टेस्टसाठी अनुष्का पोहोचली मैदानात, नेटिझन्स केलं ट्रोल

Virat Kohli 100th Test : भारताचा माजी कॅप्टन विराट कोहली १०० वी टेस्ट मॅच खेळणारा १२ वा भारतीय खेळाडू ठरला आहे. सचिन तेंडूलकरच्या नावे २० टेस्ट मॅच खेळण्याचा रेकॉर्ड आहे. सचिनच्या रेकॉर्डची इतिहासात नोंद करण्यात आली आहे. याचनिमित्ताने बीसीसीआयने विराट कोहलीचा १०० व्या आंतरराष्ट्रीय टेस्ट मॅचआधी शुक्रावारी सकाळी सन्मान केला.

भारताचा प्रसिद्ध बॉलर आणि टीमचा मुख्य कोच राहुल द्रवीडच्या हस्ते विराट कोहलीचा एक विशेष कॅप देऊन सन्मान करण्यात आला. या सन्मानानंतर विराट म्हणाला, हा क्षण माझ्यासाठी खूप खास आहे. माझी पत्नी आणि माझा भाऊ आज या ठिकाणी उपस्थित आहे. हा संपूर्ण टीम सोबत खेळण्याचा खेळ आणि तुमच्या सर्वांच्या सहयोगाशिवाय हे शक्य झाले नसते. माझा सन्मान करण्यासाठी बीसीसीआयचे मनापासून आभार.

विराटच्या या खास दिवशी त्यांची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा देखील तिथे विराटसोबत क्रिकेटच्या मैदानावर उपस्थित होती. विराटने सन्मान झाल्यानंतर अनुष्काला प्रेमाची मिठी देखील मारली. अनुष्काने सर्वांसमोर विराटचे कौतुक आणि अभिनंदन केले. विराटच्या १०० व्या टेस्टसाठी अनुष्काचे मैदानात पोहोचणे नेटिझन्सच्या काही पसंतीस उतरलेले नाही.

एका ट्विटर युझरने म्हटलेय, विराटसोबत अनुष्का मैदानात काय करतेय ? म्हणजे आता जो कोणी १०० वी टेस्ट मॅच खेळणार तेव्हा बीसीसीआयच्या अभिनंदनाच्या कार्यक्रमाला आपल्या पत्नीला घेऊन येणार का? आज विराट ज्या ठिकाणी उभा आहे तो त्याच्या मेहनतीने आणि दृढ संकल्पामुळे. तर दुसऱ्या युझरने म्हटलेय, अनुष्का शर्मा फिल्डवर काय करत आहे ? नियमांनुसार तिला फिल्डवर उपस्थित राहण्याची परवानगी आहे का ?


हेही वाचा – Gangubai Kathiawadi Box Office Collection : गंगूबाई काठियावाडीचा बॉक्स ऑफिसवर धुरळा