घरक्रीडाअंतिम सामन्यात काहीही होऊ शकते - मश्रफी मुर्तझा

अंतिम सामन्यात काहीही होऊ शकते – मश्रफी मुर्तझा

Subscribe

आशिया चषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे. या सामन्यात भारताचे पारडे जरी जड असले तरी बांगलादेश सामना जिंकू शकतील असे बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझाचे मत आहे.

आशिया चषकात भारत आणि बांगलादेश यांच्यात अंतिम सामना होणार आहे. बांगलादेशचा कर्णधार मश्रफी मुर्तझाने या सामन्याआधी बांगलादेश हा सामना जिंकण्यात सक्षम असल्याचे म्हटले आहे. या सामन्यात बांगलादेशचे अनुभवी खेळाडू शाकिब अल हसन आणि तमिम इक्बाल हे दुखापतीमुळे खेळू शकणार नाही. त्यामुळे या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात आहे. पण बांगलादेश सामना जिंकू शकतील असे मश्रफी मुर्तझा म्हणाला.

तमिम बोटाला फ्रॅक्चर असून फलंदाजीला आला तेव्हाच मी कप जिंकलो

अंतिम सामन्यापूर्वी मश्रफी मुर्तझा म्हणाला, “अगदी खरे सांगायचे तर या स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात तमिमच्या बोटाला फ्रॅक्चर असूनही तो मुशफिकूर रहीमला साथ द्यायला मैदानात आला तेव्हाच मी कप जिंकलो होतो. आधी तमिमला दुखापत झाली, त्यानंतर शाकिबलाही दुखापत झाली. तर मुशफिकूर सुद्धा पूर्ण फिट नसतानाही सामने खेळात होता. त्याच्याकडून आम्ही शिकले पाहिजे.”
बोटाला फ्रॅक्चर झाल्याने तमिमने एका हाताने फलंदाजी केली होती (सौ-IBTimes)

अंतिम सामना जिंकण्यात सक्षम

भारताचा सामना करण्याबाबत मुर्तझा म्हणाला, “भारत आमच्यापेक्षा चांगला संघ आहे. ते जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानी आहेत. स्पर्धा सुरू होण्याआधीपासूनच त्यांना ही स्पर्धा जिंकण्याचे प्रमुख दावेदार मानले जात होते. पण अंतिम सामन्यात काही होऊ शकते. आमचा संघ हा सामना जिंकण्यात सक्षम आहे.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -