घरक्रीडातिरंदाजी विश्वचषक : दीपिका कुमारीला कांस्यपदक

तिरंदाजी विश्वचषक : दीपिका कुमारीला कांस्यपदक

Subscribe

तुर्कीमध्ये सुरु आलेल्या तिरंदाजी विश्वचषकात भारताच्या दीपिका कुमारीने कांस्यपदकाची कमाई केली.

तुर्कीमध्ये सुरु आलेल्या तिरंदाजी विश्वचषकात भारताच्या दीपिका कुमारीने कांस्यपदकाची कमाई केली. तिरंदाजी विश्वचषकात हे तिचे पाचवे पदक ठरले आहे. याआधी विश्वचषकात तिने चार रौप्यपदके पटकावली आहेत.

कांस्यपदकासाठी दीपिका आणि लिसा उंरूह यांच्यात टक्कर

तिरंदाजी विश्वचषकाच्या सामन्यात कांस्यपदक मिळवण्यासाठी दीपिका आणि जर्मनीच्या लिसा उंरूह यांच्यात टक्कर होती. या सामन्यात ५ सेट संपल्यानंतर दीपिका आणि लिसा यांच्यात ५-५ अशी बरोबरी होती. त्यामुळे हा सामना शूट-ऑफमध्ये गेला. शूट-ऑफमध्ये दोन्ही खेळाडूंना १-१ बाण मारायचा होता. ज्यात दोघींनीही ९ वर बाण मारला. मात्र दीपिकाचा बाण मध्यभागाच्या जवळ लागल्याने तिला कांस्यपदक मिळाले. तिला पाचव्या सेटमध्ये फक्त बरोबरी ठेवण्याची आवश्यकता होती. पण प्रशिक्षकाविना खेळणाऱ्या दीपिकाला तसे करण्यात अपयश आल्याने हा सेट शूट-ऑफमध्ये गेला.

माझ्या प्रदर्शनाबाबत खुश

या विजयानंतर दीपिका म्हणाली, “इतक्या मोठ्या स्पर्धेत प्रशिक्षकाविना खेळण्याची ही माझी पहिलीच वेळ आहे. बरेचदा शूट-ऑफमध्ये गेलेले सामने मी हरते. यावेळी मी स्वतःला सांगत होते की निकाल काहीही लागो मी माझे सर्वोत्तम देईन. मी माझ्या प्रदर्शनाबाबत खुश आहे. पण मी यापेक्षा चांगले प्रदर्शन करू शकले असते.”
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -