घरक्रीडातुम्ही मस्करी करताय का?; कश्यपची टीका

तुम्ही मस्करी करताय का?; कश्यपची टीका

Subscribe

करोनाचा धोका लक्षात घेऊन जगातील सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा २४ जुलैपासून घेण्याचा आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी) आणि आयोजकांचा मानस आहे. त्यासाठी त्यांनी खेळाडूंना सराव सुरु ठेवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. मात्र, ही बाब भारताचा बॅडमिंटनपटू पारुपल्ली कश्यपला फारशी आवडलेली नाही.

आयओसी आम्हाला सराव सुरु ठेवण्यास प्रोत्साहन देत आहे…कसे? कुठे? तुम्ही मस्करी करताय का?, असे २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या कश्यपने ट्विटरवर लिहिले. कश्यप सध्या जागतिक क्रमवारीत २५ व्या स्थानावर आहे. ऑल इंग्लंड स्पर्धा खेळून बर्मिंगहॅममधून मायदेशी परतलेला कश्यप सध्या विलगीकरणात आहे. भारताचे बॅडमिंटनपटू हैदराबाद येथील साई-गोपीचंद अकादमीत सराव करतात. मात्र, करोनाच्या पार्श्वभूमीवर ही अकादमी ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बॅडमिंटनपटूंना सराव करण्यात बर्‍याच अडचणी येत आहेत.

- Advertisement -

टोकियो ऑलिम्पिकसाठी कोणते खेळाडू पात्र झाले हे अजून निश्चित नाही आणि जे खेळाडू पात्र झाले आहेत त्यांना सराव करण्यासाठी जागा नाही. सरकारच्या आदेशानुसार सराव केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे सराव करत राहा या आयओसीच्या विधानाला काहीच अर्थ नाही, असेही कश्यप म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -