घरक्रीडाअखेर मेस्सीच्या प्रयत्नांना यश, अर्जेंटिनाचा बाद फेरीत प्रवेश

अखेर मेस्सीच्या प्रयत्नांना यश, अर्जेंटिनाचा बाद फेरीत प्रवेश

Subscribe

मेस्सीकडून करण्यात आलेला गोल विश्वचषकातील १००वा गोल ठरला असून जगभरातील मेस्सीफॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे

जगभरातील सर्व फुटबॉलप्रेमींचा लाडका असणाऱ्या लिओनल मेस्सीची टिम अखेर बाद फेरीत पोहोचली आहे. डी गटाच्या साखळी सामन्यात नायजेरियाला २-१ ने नमवत अर्जेंटिनाने ४ गुणांसह बाद फेरीत प्रवेश मिळवला आहे. अर्जेंटिनासोबत क्रोएशियाने आईसलँडला २-० ने नमवत ७ गुणांसह बाद फेरी गाठली आहे.

arg vs nigeria
अर्जेंटिनाविरूद्ध नायजेरिया सामन्यातील एक क्षण

सामना सुरूवातीपासूनच अटीतटीचा सुरू होता. दोन्ही संघांचा बॉलवर जवळपास सारखाच ताबा दिसून येत होता. सर्व फुटबॉल जगताच्या आशा असणाऱ्या मेस्सीने १४ व्या मिनिटाला मिडफिल्डर बेनेगाकडून देण्यात आलेल्या लॉंग पासच्या मदतीने अप्रतिम गोल करत संघाला पहिले यश मिळवून दिले. यानंतर हाफ टाईमपर्यंत नायजेरियाला एक देखील गोल करता न आल्यामुळे अर्जेंटिनाने १-० अशी आघाडी सामन्यात कायम ठेवली. मात्र हाफ टाईमनंतर लगेचच ५१ व्या मिनिटाला नायजेरियाच्या व्हिक्टर मोसेने याने पेनल्टी किकच्याद्वारे गोल करत नायजेरियाला सामन्यात १-१ अशी बरोबर साधून दिली. यानंतर सामन्यात आघाडी मिळवण्यासाठी अर्जेंटिनाकडून बरेच प्रयत्न करण्यात आले अखेर सामना संपायला काही मिनिटं शिल्लक असताना अर्जेंटिनाच्या मार्कोस रोजोने जबरदस्त गोल करत संघांला विजय मिळवून दिला. अर्जेंटिना या विजयानंतर थेट बाद फेरीत पोहोचली असून त्यांचा पुढील सामना फ्रान्सशी ३० जून रोजी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार ७.३० ला सुरू होणार आहे.

- Advertisement -
अर्जेंटिनाचा संघ

मेस्सीने केला विश्वचषकातील १००वा गोल

फिफाचा २०१८चा विश्वचषक रशियात दिमाखात सुरू आहे. आतापर्यंत सर्वच सामने अतिशय चुरशीचे झाले आहेत. सर्व फुटबॉल जगताच्या नजरा असणाऱ्या मेस्सीकडून आतापर्यंत काही खास कामगिरी झाली नव्हती, मात्र नायजेरियाविरूद्धच्या सामन्याच मेस्सीने गोल केला. विशेष म्हणजे हा विश्वचषकातील १००वा गोल ठरला. या गोलमुळे मेस्सीच्या फॅन्समध्ये आनंदाचे वातावरण आहे.

messi
लिओनल मेस्सी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -