घरक्रीडाIPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची कॅमेरामनला शिवीगाळ?, व्हिडीओ तुफान व्हायरल

IPL 2023 : अर्जुन तेंडुलकरची कॅमेरामनला शिवीगाळ?, व्हिडीओ तुफान व्हायरल

Subscribe

आयपीएल २०२३ च्या १६व्या हंगामात क्रिकेट प्रेमींकडून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. राजस्थान रॉयल्स हा संघ पहिल्या क्रमांकावर आहे. तर इतरही संघ पहिला क्रमांक गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु काल आयपीएलचा २५वा सामना पार पडला. या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन संघ आमने-सामने आले होते. यावेळी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर मुंबईने १४ धावांनी विजय मिळवत सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. मात्र, या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने उत्कृष्ट कामगिरी करत एक विकेट हाती मिळवला होता. परंतु आता त्याचा एका व्हिडीओची चर्चा सोशल मीडियावर प्रचंड होताना दिसत आहे.

अर्जुन तेंडुलकर हा मुंबई इंडियन्स या संघातून खेळतो. या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये अर्जुन तेंडुलकर डगआउटमध्ये बसलेला दिसत आहे. त्यानंतर कॅमेरामनने अचानक त्याच्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र,लक्ष केंद्रित केल्यानंतर अर्जुन सहकारी खेळाडूला रागाने काहीतरी बोलताना दिसत आहे. त्याच्या लिप सिंकवरून अर्जुनने कॅमेरामनला शिवीगाळ केल्याचा अंदाज एका युझर्सकडून लावण्यात आलाय.

- Advertisement -

एका युजरने कमेंट केली की, मी अर्जुनला शिवीगाळ करताना पाहिलं. तर दुसर्‍या यूजरने लिहिलं की, जेव्हा कॅमेरा अर्जुनवर गेला, तेव्हा तो मला जाणूनबुजून दाखवतो, असे म्हटले आहे का?, असा सवाल त्याने उपस्थित केला.

- Advertisement -

मुंबईने कालचा सामना १४ धावांनी जिंकला. मुंबईने १९२/५ अशी मोठी धावसंख्या उभारली होती. प्रत्युत्तरात एसआरएचा संघ १९.५ षटकात १७८ धावांवर आटोपला. शेवटच्या षटकात एसआरएचला विजयासाठी २० धावांची गरज होती, पण अर्जुनने शानदार गोलंदाजी केली. त्यामुळे एसआरएचा संघ पूणपणे ऑलआऊट झाला आणि मुंबईला घवघवीत यश मिळालं.


हेही वाचा : WTCच्या फायनलसाठी ऑस्ट्रेलियाकडून संघ जाहीर, ७ जूनला होणार टीम इंडियाविरुद्ध सामना


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -