Thursday, June 1, 2023
27 C
Mumbai
घर क्रीडा IPL 2023 : मुंबईच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अर्जुन तेंडुलकरच्या हाताला चावला कुत्रा?

IPL 2023 : मुंबईच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी; अर्जुन तेंडुलकरच्या हाताला चावला कुत्रा?

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL 2023) आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

इंडियन प्रीमियर लीगमधील (IPL 2023) आजचा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात होणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा आणि वेगवान गोलंदाज अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) याच्या हाताला कुत्र्याने चावा घेतल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत अर्जुन तेंडुलकर याने स्वत: माहिती दिली आहे. त्यामुळे लखनऊ विरुद्धचा आजचा सामना अर्जुनला खेळता येणार नाही.

लखनऊ सुपर जायंट्सने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अर्जुन तेंडुलकरने आपल्या हाताला कुत्रा चावल्याचे सांगितले. तसेच, या व्हिडीओला ‘माझा मित्र मुंबईहून आला आहे’, असे कॅप्शन देण्यात आले आहे. (Arjun Tendulkar Bitten By Dog Reached Lucknow LSG vs MI VVP96)

- Advertisement -

याशिवाय, या व्हिडीओमध्ये युधवीर चरक आणि अर्जुन तेंडुलकर एकमेकांशी बोलत आहे. यावेळी अर्जुन हा युधवीर चरक सांगतो की कुत्रा चावल्यामुळे त्याच्या गोलंदाजीच्या हाताच्या बोटांवर जखमा झाल्या आहेत.

या घटनेमुळे अर्जुनला विश्रांती देण्यात आली होती. अर्जुनने 25 एप्रिलपासून एकही सामना खेळलेला नाही. त्याने यावर्षी मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. अर्जुनने 16 एप्रिल रोजी मुंबईसाठी पदार्पण केले, कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध दोन षटके टाकली आणि 17 धावा दिल्या. यानंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात (18 एप्रिल) भुवनेश्वर कुमारला बाद करून त्याने आयपीएलची पहिली विकेट मिळवली.

- Advertisement -

अर्जुनने पंजाबविरुद्धही एक विकेट घेतली. त्याने प्रभसिमरनला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर गुजरातविरुद्ध (25 एप्रिल) अर्जुनने दोन षटकांत नऊ धावा देऊन वृद्धीमान साहाची विकेट घेतली. एकूणच अर्जुनने आयपीएलमध्ये आतापर्यंत 4 सामन्यांत 3 विकेट घेतल्या आहेत.

मुंबईचा संघ प्ले-ऑफच्या शर्यतीत

मुंबईच्या संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यापैकी 7 सामने जिंकले असून 5 सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागला आहे. सात सामन्यात विजय मिळवल्याने आतापर्यंत मुंबईचे 14 गुण झाले आहेत. आज मुंबईचा सामना लखनऊशी होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्सने जिंकला तर त्यांचे 16 गुण होतील आणि संघ जवळपास प्लेऑफसाठी पात्र ठरेल. यानंतर मुंबईचा अखेरचा सामना हा सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणार आहे.


हेही वाचा – IPL 2023 : गौतम गंभीरची विराट कोहलीशी दुश्मनी अन् रोहित शर्माशी दोस्ती; वाचा नेमके असं का?

- Advertisment -