घरक्रीडारणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताच अर्जुन तेंडुलकरची उत्कृष्ट कामगिरी, शतक ठोकत रचला इतिहास

रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण करताच अर्जुन तेंडुलकरची उत्कृष्ट कामगिरी, शतक ठोकत रचला इतिहास

Subscribe

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरने रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण करताच उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याने शतक ठोकत इतिहास रचला आहे. गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकरने राजस्थानविरूद्धच्या पहिल्या डावात 178 चेंडूत नाबाद शतकी खेळी केली. अर्जुन तेंडुलकरने आपल्या वडिलांप्रमाणे मुंबईमधून आपल्या क्रिकेट कारकिर्दिची सुरूवात केली आहे.

गोवा आणि राजस्थान संघात गोव्यामध्ये सुरू असलेल्या सामन्यात राजस्थानने प्रथम गोलंदाजी केली. त्यानंतर पहिल्याच दिवशी राजस्थानने गोव्याच्या संघाला धुळ चारली. परंतु सुयश प्रभुदेसाई आणि अर्जुन तेंडुलकर यांनी गोव्याचा डाव सावरला. प्रभुदेसाईने शतक ठोकले तर अर्जुनने लंचपर्यंत अर्धशतक पूर्ण केले. त्यानंतर अर्जुनने आक्रमक फलंदाजी करत 178 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. या दोघांनी सहाव्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी करत गोव्याला 140 ओव्हर्समध्ये 410 धावांपर्यंत पोहचवले.

- Advertisement -

अर्जुन तेंडुलकरने देखील सचिनप्रमाणेच आपल्या पहिल्या रणजी ट्रॉफी सामन्यात शतकी खेळी केली. सचिनने 1988 मध्ये गुजरातविरूद्ध हा कारनामा केला होता. अर्जुनने विविध वयोगटात मुंबईचे प्रतिनिधित्व केले. अर्जुन मुंबईकडून मुश्ताक अली टी 20 स्पर्धेचे काही सामने खेळला आहे. त्याची मुंबईच्या रणजी संघात देखील निवड झाली होती. मात्र त्याला मागील हंगामात संधी मिळाली नव्हती. त्यामुळे त्याने गोव्याकडून खेळण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

हेही वाचा : अर्जुन तेंडुलकरचे रणजी क्रिकेटमध्ये पदार्पण, ‘या’ संघाकडून


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -